बेकायदा दारुविक्रीला पाठबळ कोणाचे ? (वार्तापञ)

शिरूर,ता.१४ डिसेंबर २०१७(मुकुंद ढोबळे) : शिरूर तालुक्यात असणारे अनेक होटेल्स, विनापरवाना तर अनेक धाबे, हॉटेल्स मधे खुलेआम देशी विदेशी दारू विक्री होत असून यावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही असा सवाल व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुक्यांत पुणे नगर महामार्ग असो वा अंतर्गत रस्ते असो प्रत्येक गावात जाणाऱ्या रस्त्यांवर अर्धा किमी च्या आत हॉटेल,धाबे,पहावयास मिळतात परंतु याच्या आडून येथे खुलेआम राजरोस पणे दारू व्यवसाय सुरू आहे.या हॉटेल्स ला ना कुठलाच परवाना नसून विना परवाना हे व्यवसाय सुरू आहे.या हॉटेल,ढाबे पहायला गेलो तर येथे अस्वच्छता चा कळस दिसून येतो.अतिशय घाण असणारे किचन,तिथेच कोंबडी कापायची तिथेच मसाला तिथेच बनवायचा यामुळे मोठी दुर्गँधी या परिसरात पसरलेली असते. यावर परवाना जवळ जवळ ऐंशी टक्के हॉटेल,धाबे व्यवसाय करणाऱ्या कडे नाहीच.ग्रामपंचायत,नगर परिषद यांचा परवाना नाही.खुले आम विना परवाना चालणाऱ्या या व्यवसाय धारक यांच्यावर शासनाच्या कुठल्याच खात्याचे लक्ष नसल्याचे दिसून येते. त्याबरोबर हे हॉटेल आहे का दारूचा गूत्ता ? हे सुद्धा कळत नाही. या सर्व हॉटेल वर विना परवाना दारू व्यवसाय सुरू आहे तर हे हॉटेल रात्री अकरा नंतर बंद असायला हवे परंतु यावर कुणाचे नियंत्रण नसल्याने रात्रं दिवस सुरू असल्याचे दिसून येत आहे.यांच्यातील अनेक हॉटेल राजकीय नेते पुढारी यांचे असल्याने याकडे सर्वच खाते दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते तर यामुळे अन्न भेसळ ना उत्पादन शुल्क खाते,ना पोलीस खाते,ग्रामपंचायत या खात्याचे कुठलेच नियंत्रण नसल्याने हा अवैद्य धंदा खुले आम राजरोस पणे सुरू आहे.यावर नियंत्रण आणून या हॉटेल धाबे यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची खरी गरज आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असणारे सर्वच हॉटेल म्हणजे देशी विदेशी दारूचे माहेरघर आहे.तुम्हाला ज्या प्रकारची दारू हवी ती तुम्हाला येथे मिळत असून.याभागात बनावट दारू ही मोठ्या प्रमाणात मिळत आहे.येथील हॉटेल्स म्हणजे विनापरवाना दारूची दुकाने असून यावर कोणाचे नियंत्रण नाही कारण हे हॉटेल्स मालक हे राजकीय पुढारी, औद्योगिक वसाहतील भाई लोकांचे असून पोलीस खाते आणि यांची छुपी युती असल्याचे दिसुन येते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या