कारेगावजवळ बसने ठोकरल्याने सख्ख्या भावांचा मृत्यू

कारेगाव, ता.१६ डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) : येथील फलके मळा येथे गुरुवारी (ता. 14) राञी भरधाव आरामदायी बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन सख्या भावांचा ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीत कामाला असलेले जयकुमार महासिंग वरकडे (वय 35), मोहपाल महासिंग वरकडे (वय 23, दोघे रा. फलके मळा, कारेगाव, ता. शिरूर, मुळ गाव युटेरा ता. केवलारी जि.सिननी, मध्यप्रदेश) हे कामाचा पगार आणण्यासाठी रांजणगाव गणपती येथे गेले होते. तेथून परत माघारी येत असताना फलके मळा येथे  ट्रॅव्हल  बसने पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने जात असताना जोरदार धडक देऊन चिरडले. यात या दोघांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्या आधीच उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. अशोककुमार उजरासिंह परते यांनी याबाबत रांजणगाव पोलिंसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, अपघातानंतर खासगी आरामदायी बसचा चालक अपघातस्थळी न थांबता, बस घेऊन पळून गेला. स्थानिक तरुणांनी या बसचा क्रमांक पाहिला होता. त्या माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे तपासी अधिकारी शशिकांत भोसले यांनी सांगितले. अपघात घडवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बसचा क्रमांक एमएच 17, एजी 4550 असा आहे. या बसचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत भोसले हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या