अल्पवयीन मुलीला ञास दिल्याने विनयभंगाचा गुन्हा

आंबळे, ता.१६ डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) :  येथे अल्पवयीन मुलीला वारंवार ञास दिल्याने एकावर शिरुर पोलीस स्टेशनला  विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी हि पुण्यातील एका संस्थेत शिकत नववीत शिकत होती. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त तिचे पालक मुलीला दिवाळीसाठी गावी आणण्यासाठी गेले होते.त्यावेळी वसतीगृहातील शिक्षकांनी मुलीकडे मोबाईल सापडला असल्याची माहिती दिली. यानंतर पालकांच्या कानावर ही बाब सांगितल्यानंतर त्या मुलीला पालकांनी गावी आणले.सदर मुलीकडे पालकांनी विश्वासात घेउन विचारपुस केल्यानंतर गावातीलच विकास हरिभाउ जाधव हा पीडीत मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन बोलण्याचा प्रयत्न करत असे. त्यावेळी त्यानेच पिडित मुलीला बोलण्यासाठी फोन घेउन दिल्याचे व फोनवर बोलले नाहीतर जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे पालकांना सांगितले. यानंतर पालकांनीही आरोपीच्या आई वडील व नातेवाईंकाना याबाबत समजावण्यास सांगितले. परंतु गेल्या काही दिवसांपुर्वी पालकांनी पिडित मुलीस याबाबत विचारले असता आरोपी विकास हा पाठलाग करत असल्याचे व बोलण्याची सक्ती करत असल्याचे व चिठ्ठया पाठवत असल्याचे सांगितले. या ञासाला कंटाळून अखेर पालकांनी शिरुर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध तक्रार दिली आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण आदी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास  शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पाटील हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या