व्हॉट्सअपवर अफवा पसरविल्याने एकावर गुन्हा दाखल

शिक्रापूर,ता.१८ डिसेंबर २०१७ (शेरखान शेख ) : शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत सोशल मिडीयावर अफवा पसरविल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून शिक्रापूर पोलिसांनी सोशल मिडीयावर करडी नजर ठेवली असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले.

जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच एकनाथ मासळकर यांनी आज त्यांच्या मोबाईल नंबर च्या whatsaap वरून त्यांच्या संपर्कातील लोकांना धामणे गावामध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाला त्यामध्ये चार पाच भैयकांड असल्याचा अंदाज, त्यातील एक भैया फरार, मुंबई वरून महिला आयोगाचं पथक दाखल, हि बातमी सर्वत्र पसरवा त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कोपर्डी सारखी घटना पुन्हा धामने गावामध्ये पुणे जिल्हा येथे तसेच त्यानंतर दुसऱ्या मेसेजमध्ये कुठे गेले मोर्चेवाले, हि नाही का आपली निरागस बहिण, तिला न्याय मिळवून देण्यासाठी हा मेसेज पुढे पाठवा तुम्हाला तुमच्या बहिणीची शपथ आहे. अशा आशयाचा मजकूर व फोटो सोशल मिडीयावर प्रसारित केला असल्याची घटना घडली त्यामुळे  शिक्रापूर पोलिसांची एकनाथ मासळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहे.

नागरिकांनी कोणतेही मेसेज पसरवू नयेत : गलांडे

सोशल मिडीयावर चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये भिती निर्माण होईल असे कृत्य केल्याने जातेगाव खुर्द येथील माजी उपसरपंच एकनाथ मासळकर यांचेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलत असताना नागरिकांनी whatsaap मधून कोणतेही मेसेज नागरिकांना पाठवून गैरकृत्य करू नये. अशा लोकांवर पोलिसांची करडी नजर असून प्रत्येक ग्रुप अड्मीन व त्यातील मेसेज करणाऱ्या सदस्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या