तुमच्याच जमातीचे आहे सांगुन वृ्द्ध दांमत्याला लुटले

शिरुर,ता.१८ डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) : शिरुर येथे  भाजीबाजारात वृद्ध दांमपत्यास मदत करण्याच्या बहाण्याने अज्ञात इसमाने रोख रक्कम १५ हजार रुपये व सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना घडली.या घडलेल्या प्रकारात एकुन ७७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी अमीना गनी शहा(वय.७५.रा.भाजीबाजार फकीर मोहल्ला) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी हे शनिवार(दि.१६) रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती गनी हुसेन शहा हे घरी असताना एका अनोळखी (वय अंदाजे ३२), डोकयात टोपी घातलेला व दाढी वाढलेला इसमाने, मी तुमच्या जमातीचा माणुस आहे.असे सांगुन फिर्यादीच्या घरात प्रवेश केला.यानंतर गप्पा मारत मी समाजातील गरीबांसाठी मदत करतो व कोर्टाचीही कामे करतो तसेच मी पारनेर येथे राहत असल्याचे  असे सांगुन त्याने तुमच्या घराचे काम करायचे असेल तर  मी कोर्टात तुमचे गळ्यातील व कानातील दागदागिने दाखवुन तुम्हांला जास्त पैसे मिळवुन देतो असे सांगितले.त्यानंतर फिर्यादीने जवळचे असणारे ६२ हजार पाचशे रुपयांचे सोन्याचा गळ्यातील पत्ता व कानातील फुले हे दागिने  व १५ हजार रुपये रोख रक्कम त्या इसमाने घेउन कोर्टात येण्यास सांगितले.

यानंतर फिर्यादीसह पती व अज्ञात इसम हे कोर्टात गेले.त्यावेळीत फिर्यादी व फिर्यादीच्या पतीस वेगवेगळ्या ठिकाणी बसविले. व त्याचठिकाणी फिर्यादी कडुन पैसे व दागिने त्या अज्ञात इसमाने घेतले.व फिर्यादीस पैसे जास्त करतो असे सांगुन दागिने व पैसे घेउन लंपास झाला तो परत आलाच नाही.या दांपत्याने त्या इसमाची वाट पाहिली परंतु तरीही तो न आल्याने अखेर घरी आल्यानंतर घरी आल्यावर मुलीने दागिन्याबाबत विचारणा केली.या वेळी या दांमत्याने घडलेला प्रकार मुलीला सांगितला. व त्यानंतर शिरुर पोलीस स्टेशनला या दांपत्याने धाव घेउन अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दिली आहे.
या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या