शिरुर च्या पुर्व भागातील बंधा-यांना गळतीचे ग्रहण

सादलगाव,ता.१९ डिसेंबर २०१७ (संपत कारकूड) : सादलगाव व मांडवगण फराटा येथील दोन्हीही बंधा-यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असुन प्रशासन आता काय झोपलंय का असा सवाल शेतकरी वर्गाकडुन केला जात आहे.

शिरुर व दौंड तालुक्याला वरदान ठरत असलेल्या पुर्व भागात भिमानदीवर सादलगाव व मांडवगण फराटा येथे दोन बंधारे बांधलेले आहेत.या वर्षी मुबलक प्रमाणात पाउस झाल्याने भिमानदीवरील सर्व बंधारे पुर्ण क्षमतेने भरलेले होते.परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे व नेहमी प्रमाणे नियोजनशुन्यतेमुळे या दोन्ही बंधा-यांत साठवलेला पाणी साठा कमी होत आहे.या दोन्ही बंधा-यांना गळतीचे ग्रहण लागलेले असुन यावर प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असुन शेतक-यांना पुन्हा उन्हाळ्यात पाणी टंचाई ला सामोरे जावे लागेल याची भिती व्यक्त केली जात आहे.सादलगाव येथील बंधा-यातुन मोठ्या प्रमाणावर गळती होत असुन मांडवगण फराटा येथील बंधा-याचीही तशीच अवस्था आहे.

याकडे प्रशासनाने व तालुक्याच्या लोकप्रतिनीधींनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असुन गळती तातडीने थांबविण्यात यावी अशी मागणी शेतकरीवर्गातुन होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या