ढमढेरे महाविद्यालयाचे उरळगावला श्रमसंस्कार शिबीर

उरळगाव,ता.२० डिसेंबर २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार  शिबीर उरळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहीती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पद्माकर गोरे व डॉ.दत्तात्रय वाबळे यांनी दिली.

स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान हा विशेष श्रमसंस्कार शिबीराचा मुख्य विषय असून बुधवारी या शिबीराचे उद्घाटन आमदार बाबुराव पाचर्णे व जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते होणार आहे.शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास जि.प.च्या बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, पंचायत समिती सदस्या अर्चना भोसुरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, सरपंच उज्वला गायकवाड, उपसरपंच रोहीणी भोसुरे, युवा उद्योजक ज्ञानेश्वर थेउरकर, महेश भुजबळ, नंदकुमार कु-हाडे प्राचार्य डॉ.पी.आर.पाटील, डॉ.पराग चौधरी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

मंगळवार(दि.26 डिसेंबर)पर्यंत चालणा-या या शिबीरात आरोग्य तपासणी, महिला सबलीकरण, वॄक्षारोपण, ग्राम स्वच्छता अभियान, सांस्कॄतिक कार्यक्रम,  व्यक्तिमत्व विकास, जल व्यवस्थापन, शिवार फेरी व समाज प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात येणार असून,या शिबीरात स्वामी विवेकानंद आणि युवक, शामची आर्इ– माझी आर्इ, जलसंधारण व युवक, वॄक्षसंवर्धन काळाची गरज, ग्रानीण विकास आणि युवक, आरोग्य युवकांचे आदी विषयावर तज्ञांची व्याख्याने होणार असल्याचेही रासेयो विभागाचे  गोरे यांनी सांगीतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या