शिरुरला मोबाईलवर फोन करुन एकाला गंडविले

शिरुर, ता. २० डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) : मोबाईलवर फोन करुन बॅंकेची वैयक्तिक माहिती विचारुन एकाची सुमारे ५० हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात इसमावर शिरुर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भरत चौधरी (रा.सध्या पाबळ फाटा, शिरुर मुळ गाव कोहकडी, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांच्या मोबाईल वर अज्ञात इसमाने फोन करुन, तुम्ही एसबीआय कंपनीचे क्रेडिट कार्ड घेतले असल्याने तुम्हांला गिफ्ट व्हाउचर मिळाले आहे. ते तुमच्या पत्त्यावर पाठवायचे असे सांगितले. फिर्यादी यांची वैयक्तिक माहिती विचारुन फिर्यादीच्या बॅंक खात्यातील ५० हजार इतकी रक्कम काढण्यात आली. रक्कम गेली असून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी शिरुर पोलीस स्टेशनला धाव घेउन अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दिली.

शिरुर पोलीसांनीही फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविली. या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या