पुस्तकी किडा बणविण्याऐवजी बाह्य शिक्षण गरजेचेः पावसे

वरुडे, ता. 20 डिसेंबर 2017: राज्य घटनेतील मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविण्यासाठी व त्यांना देशाचा सुजाण नागरिक बणविण्यासाठी शिक्षकांनी कठोर मेहनत केली पाहिजे. मुलांना पुस्तकी किडा बणविण्याऐवजी त्यांना बाह्य जगाशी कसे वागावे हे शिक्षण मिळने गरजेचे आहे, असे कोंढापुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे म्हणाले.

विद्या भारती पुणे व शांतिलाल मुथा फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम कोंढापुरी केंद्रातील प्राथमिक शाळा वरुडे येथे घेण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या शिक्षकांना पावसे यांनी मार्गदर्शन केले.

चार दिवशीय प्रशिक्षण शिबिरास सुर्यकांत बढे व सुनिता पवार/हिंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून शिक्षकांची मोराची चिंचोली येथे परिसर सहल नेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक होनराव गभाले यांनी विशेष सहकार्य केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या