खाऊच्या पैशांतून चिमुकल्यांना मिळाले उबदार स्वेटर

शिरुर, ता.२१ डिसेंबर २०१७ (सतीश केदारी) : येथील विद्याधाम प्रशालेच्या नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वत:चे खाउचे पैसे जमा करुन रामलिंग रोड वर असणा-या आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन मधील विशेष मुलांना एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २४ स्वेटर नुकतेच आकांक्षा एज्युकेशनलच्या संस्थापिका राणीताई चोरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

रामलिंग रोड वर आकांक्षा एज्युकेशनल हि संस्था विशेष मुलांसाठी कार्य करते. कडाक्याच्या थंडीत चिमुकल्यांना स्वेटर नसल्याने या विशेष मुलांना थंडीतील संरक्षणासाठी स्वेटरची गरज होती. हीच गरज लक्षात घेत येथील विद्यार्थ्यांनी आपले खाउचे पैसे वाचविले व त्यातुन या विशेष मुलांसाठी स्वेटर खरेदी केले होते. हे खरेदी केलेले स्वेटर नुकतेच संस्थेचे प्राचार्य खरमाटे, उपमुख्याध्यापक दळवी सर, पर्यवेक्षिका पटेल मॅडम, वर्गशिक्षिका चोरमुले मॅडम आदींच्या हस्ते संस्थेस देण्यात आले.

तर संस्थेतील विशेष मुलांना स्वेटर मिळाल्याने या मुलांच्या चेह-यावर विशेष आनंद जाणवत होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या