वाघोलीतून ४ गावठी पिस्तुलासह दोन अटकेत

शिरुर,ता.२१ डिसेंबर २०१७(सतीश केदारी) : वाघोली येथुन ४ गावठी पिस्तुल व १० जिवंत काडतुसासह दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांनी दिली.
पुणे ग्रामीण चे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले कि,  राजेंद्र माणिक राठोड (वय ३२ वर्षे रा.वाघोली, ता.हवेली, जि.पुणे मूळ रा.निमगाव मायंबा ता.शिरूर कासार जि.बिड  व धोंडिभाऊ महादू जाधव वय २५ वर्षे, रा.निघोज, ता.पारनेर, जि.अहमदनगर असे या आरोपींची नावे असुन हे दोन्ही रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत.

पुणे जिल्हयात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणेसाठी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचे  आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी स्वतंत्र पथकांची नेमणूक करून गुन्हेगारांना जेरबंद करणेसाठी विशेष मोहीम राबवलेली आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, सहा.फौजदार दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, पोपट गायकवाड, राजू मोमीन, दत्तात्रय जगताप, मोरेश्वर इनामदार, रवि शिनगारे, विजय जांभळे यांचे पथकास (दि.२०) रोजी सायंकाळचे सुमारास वाघोली, बाजार मैदान चौक, श्रीहरी मिसळ हॉटेलचे समोर शिरूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील मारामारीचे गुन्ह्यातील फरारी असलेला व रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार राजेंद्र उर्फ राजा राठोड (रा.वाघोली, ता.हवेली) व  त्याचा साथीदार  धोंडिभाऊ जाधव (रा.निघोज, ता.पारनेर, जि.अहमदनगर) असे दोघेजण गावठी पिस्तुलची विक्री करण्यासाठी येणार असलेची माहीती मिळालेने गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी साध्या वेशात सापळा लावून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन बेकायदा व बिगरपरवाना एकूण ४ गावठी बनावटीचे पिस्तुल व १० जिवंत काडतुसे जप्त केलेली आहेत.

राजेंद्र राठोड याचा (निघोज ता.पारनेर जि.अहमदनगर) या परिसरात वाळूचा व्यवसाय असून त्याने यापूर्वी गंगापूर जि.औरंगाबाद तसेच पुणे जिल्हयातील दौंड, शिरूर येथेही वाळू व्यवसाय केलेने तेथील वाळू माफीयांशी व गुन्हेगारांशी त्याचे संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच पारनेर येथील तहसीलदार  यांचेवर वाळू माफीयाने केलेल्या हल्ल्यामुळे महसूल विभागाने वाळू माफीयांवर कारवाई करणेसाठी विशेष मोहीम राबविल्यामुळे तो वाघोली येथे वास्तव्यास येवून हॉटेल व्यवसाय सुरू करणार असलेची माहीती गुन्हे शाखेचे पथकास मिळाली होती. तसेच राजेंद्र राठोड हा सुमारे एक वर्षापासून शिरूर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मारामारीचे गुन्हयामध्येही फरार होता.सदर दोन्ही आरोपीना पुढील कार्यवाहीसाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या