ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन तत्काळ हलवा

शिरुर,ता.२२ डिसेंबर २०१७(प्रतिनीधी) : शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन हे दुस-या मजल्यावरुन तळमजल्यावर हलवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली असुन मागनी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या बाबत मगणीचे निवेदन ग्रामीण रुग्नालयाचे अधिक्षक यांना देण्यात आले.या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,शिरुर ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे हे तपासणी मशिन दुस-या मजल्यावर असल्याने सामान्य नागरिक, अपघात ग्रस्त, वयोवृद्ध यांसह अनेक रुग्णांना मोठा नाहक ञास सहन करावा लागत असुन त्यामुळे हे एक्स-रे मशीन दुस-या मजल्यावरुन तत्काळ तळमजल्यावर हलविण्यात यावे.तसेच सामान्य नागरिकांना अद्ययावत सेवा(इंजेक्शन,लसीकरण,विविध चाचण्या) तातडीने पुरवाव्यात.व अपघातग्रस्त दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी मनविसे चे तालुकाध्यक्ष स्वप्निल  माळवे, शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर आदी या वेळी उपस्थित होते.

या मागणीमुळे पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकिस आला असुन कुठल्याही रुग्णालयात ही मशिन तळमजल्यावर असते परंतु शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात हे मशिन ठेवण्याचा अजब प्रकार घडला आहे.शिरुर ग्रामीण रुग्णालयातुन मिळणा-या सुविधांबाबत  अनेकांनी यापुर्वीही वेळोवेळी तक्रारी केल्या असुन तरी देखिल अपघातग्रस्तांचे होणारे हाल, रुग्णांची होणारी फरफट, तसेच विविध सुविधांचा अभाव या गोष्टींकडे नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या