शिरूर 'सेतू'मध्ये भोगाव्या लागतात मरणयातना...

शिरूर, ता. 23 डिसेंबर 2017 (संपत कारकूड) भाग 1 : शिरूर तलसिलदार कार्यालयात विविध दाखल्यांसाठी येणाऱया सामान्य नागरिकांना दाखल्यासाठी तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे. 'सेतू'च्या कामकाजाबाबत तालुक्यातील सर्व भागांतील नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नागरिकांची तत्काळ सोय व्हावी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी विविध दाखले मिळविण्यासाठी सोपी उपाययोजना म्हणून सेतू केंद्राकडे पाहिले जाते. परंतु 'शिरूर सेतू'मधील दाखल्यांशी संबंधित काम करणारे कर्मचारी स्वतःच अधिकारी असल्यासारखे वागत असून, दाखले देण्याची मोठी मेहरबानी सामान्य नागरिकांवर करीत आहेत. दररोज दाखले घेण्यासाठी नागरिकांची येथे मोठी गर्दी असते. या गर्दीवर व शिस्तीवरही तहसिलदार कचेरीचे कोणतेही नियंत्रण नाही. एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जावे, अशी स्थिती सध्या येथे दाखले घेताना अनुभवास येते.

जेष्ठ नागरिकांना रांगेमध्ये उभे राहण्याची मोठी शिक्षा मिळत असून, त्यांच्याकडे कोणीही सहानुभूतीने पाहत नसल्याचे रोजचे चित्र आहे. 'शिरूर सेतू'सेवा एक शिक्षा' अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. 'शिरूर सेतू'ची सेवा नायलाजास्तव स्वीकारण्याची वेळ तालुक्यातील सर्वांवर आलेली आहे. 'सेतू'मध्ये बहुतांश काम संगणाकवरच केले जाते. संगणकाची संख्याही पुरेशी नाही. नागरिकांकडून अचानक कामाचा लोड वाढल्यास, वाढत्या कामाचा निपटारा कसा करावा? याचे साधे भान आणि जाणिव नसलेल्या कर्मचाऱयांना त्यांच्या कामाची जाणीव करुन देण्याची वेळ सध्या आली आहे.
क्रमश:

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या