पांडूरंग विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी बनविल्या आकर्षक वस्तू

विठ्ठलवाडी, ता. 25 डिसेंबर 2017 (एन. बी. मुल्ला): येथे विद्यार्थ्यांनी टाकावू लग्नपत्रिकांपासून टोप्या, मुखवटे बनवून नाताळ सण साजरा केला. तसेच टाकावू पासून टिकावू व आकर्षक वस्तू बनविण्याचा समाजाला संदेश दिला.

विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर मधील 65 विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक प्रविण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 130 टाकावू लग्नपत्रिकांचा वापर करून 65 टोप्या व 5 सांताक्लॉजचे मुखवटे बनवून पर्यावतणपुरक उपक्रम राबविला. या उपक्रमास उत्स्फूर्तपणे साथ देत विद्यार्थ्यांनी नाताळ सणाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमात राहूल गवारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण होण्याच्या दॄष्टिने 350 विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप केले व यामध्ये सुका कचरा व टाकावू वस्तू साठवून ठेवून महिण्यातून एकदा ती पिशवी शाळेत आणून त्यामधील टाकावू वस्तूपासून आकर्षक विविध गॄहोपयोगी वस्तू बनविण्याचेही गवारे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. नाताळ निमीत्त कला-कार्यानुभव अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी सांताक्कॉजचे मुखवटे व टोप्या बनवविण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला. यावेळी मुख्याध्यापक राजाराम नजन, सुरेश थोरात, कला शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रविण जगताप, प्रभाकर चांदगुडे, अरूण शिंदे, विशाल कुंभार, प्रियंका ढमढेरे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या