खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावाच्या रस्त्याची दुरावस्था

तळेगाव ढमढेरे, ता. 25 डिसेंबर 2017 (एन.बी.मुल्ला): पुणे-अहमदनगर महामार्गावरील कासारी फाटा ते कासारी गाव या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. मात्र, या गावाशी जोडल्या गेलेल्या सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे हे विशेष.
कासारी फाटा ते कासारी गाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कासारी येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकलवरून जाताना कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांनाही या रस्त्याने प्रवास करणे जिकीरीचे होत आहे. पुणे-नगर महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून शेत मालाची व दुधाची वाहतुक मोठया प्रमाणात होते. रस्त्याच्या सार्इडपट्याही तुटल्याने वाहतुकीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
खासदारांनी दत्तक घेतलेल्या रस्त्याची ही अवस्था तर तालुक्यातील इतर रस्त्यांबाबत बोलायलाच नको, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या