न्हावरे फाट्याजवळ मोटार आगीत जळून खाक (Video)

शिरुर, ता.२५ डिसेंबर २०१७ (सतीश केदारी) : न्हावरे फाटा जवळील घावटे मळ्यात ओम्नी कार ने अचानक पेट घेतला.या आगीत सुदैवाने चालकाला कोणतीही इजा झाली नाही.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर वरुन फलके मळा येथील ओम्नी कारचालक शिवाजी मोरे हे काम आटोपुन घरी निघाले होते.शिरुर वरुन निघाल्यानंतर न्हावरे फाट्याजवळ  आले असता ओम्नी कार ने अचानक पेट घेतला.गाडीतुन धुर निघत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखुन गाडीतुन खाली उतरत असतानाच गाडीने जास्तच पेट घेतला.अन आगीनेही रौद्र रुप धारण केले.गाडीने पेट घेतला असल्याचे लक्षात येताच या महामार्गावरुन धावणा-या वाहनांनी तत्काळ वाहने थांबवली.दरम्यान येथीलच नागरिकांनी शेजारील असणा-या गोडावुन वरुन मोटर चालु करुन पाइपाच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.हे सर्व करत असताना गाडीच्या आतील गॅसटाकीच्या स्फोटचीही भिती होती.परंतु वेळीच पाण्याचा मारा केल्याने हा धोका टळला.या नंतर संपुर्ण कार  जळत असतानाच रांजणगाव येथील अग्निशामक यंञणा दाखल झाली अन गाडीवर पाण्याचा मारा करुन संपुर्ण आग आटोक्यात आली.
घटनेची वार्ता कळताच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे, पोलीस कॉंस्टेबल किशोर धावडे, आर. डी.ढगे, आदींनी तत्काळ धाव घेउन गर्दीवर नियंञण ठेवले.व काही काळ ठप्प झालेली वाहतुक सुरळीत करण्यात आली.

न्हावरे फाट्यावजवळ आग लागलेली पाहणा-या काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांशी संवाद साधला असता चालकाचे दैव बलवत्तर म्हणुन चालकाचा जीव वाचला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या