जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार-राहुल रणदिवे

रांजणगाव सांडस, ता.२९ डिसेंबर २०१७(प्रतिनीधी) : जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवुन सर्वांना सोबत घेउन काम करणार असल्याचे रांजणगाव सांडस येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राहुल रणदिवे यांनी बोलताना सांगितले.
संपुर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या रांजणगाव सांडस येथील ग्रामपंचायतची निवडणुक नुकतीच पार पडली.शिरुर तालुक्यात एकमेव निवडणुक असलेल्या या ग्रामपंचायतीत प्रथमच मोठ्या मताधिक्याने राहुल रणदिवे हे निवडणुक आले आहे.या ग्रामपंचायतीत सर्वात तरुण चेहरा म्हणुन रणदिवे यांच्याकडे पाहिले जात असुन शिरुर तालुक्यात सोशल मिडियासह सर्वञ प्रचंड मताधिक्याने निवडुन आलेल्या या उमेदवाराची चर्चा होताना दिसत आहे.

याबाबत थेट त्यांच्याशी चर्चा केली असता, या ग्रामपंचायतीत अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे जनतेने धनशक्ती ला न जुमानता  जनशक्तीला प्राधान्य देउन प्रचंड मताधिक्याने मला निवडून दिले असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, राजकारणापेक्षा आगामी काळात जनतेच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी वेगवेगळे विधायक व समाजपयोगी उपक्रम राबविणार आहे.त्याचबरोबर तळागाळातील सर्व घटकांना सोबत घेउन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राहुल रणदिवे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या