विधानपरिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरेंचे निधन

हिवरे,ता.५ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : विधानपरिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे (वय.६८)यांचे दिर्घ आजाराने निधन झाले.डावखरे यांच्यावर आज (ता.५) रोजी ठाणे येथे दुपारी तीन वाजता  अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

डावखरे हे गेल्या काही महिन्यांपासुन आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असतानाच गुरुवारी(ता.४) रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पुञ आमदार निरंजन,प्रबोध, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

राजकारणातील अजातशञु अशी ओळख असलेल्या डावखरे यांनी विधानपरिषदेत सलग १७ वर्षे उपसभापतीपद म्हणुन काम पाहिले.त्याचबरोबर शरद पवार यांचे अंत्यत विश्वासु सहकारी म्हणुन ही ख्याती होती.

शिरुर तालुक्यातील हिवरे या गावात ८ नोव्हेंबर १९४९ रोजी डावखरे यांचा जन्म झाला.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या डावखरे यांनी स्वकर्तृत्वावर राजकारणात नाव कमावले.शेतकरी कुटुंबात वाढलेल्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठीही संघर्ष कराव्या लागणा-या वसंतरावांना देशभक्तीचे बाळकडू त्यांचे वडील शंकरराव यांच्याकडून मिळाले. दत्ताजी ताम्हाणे यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात शंकरराव सहभागी झाले होते. घरातूनच देशभक्तीचा वारसा लाभलेल्या डावखरे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात प्रवेश केला. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असतानाही काही भाजपाच्या नगरसेवकांशी मैत्रीचा हात पुढे करून 1987मध्ये प्रथमच महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणली होती. तरीही, कै. आनंद दिघे आणि त्यांची राजकारणापलीकडची मैत्रीही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेची, राजकारणाच्या पलीकडे राहिल्याने त्यानंतर राज्य विधान परिषदेवरही ते निवडून गेले. सलग तीन टर्म उपसभापतीपदही त्यांनी भूषविले.

राजकारणात राहुनही सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित केलेल्या डावखरे यांच्या निधनाने राजकारणातील अजातशञु हरपल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या