'त्या' बुलेटस्वारांचा शिरुर शहरात धुमाकुळ सुरुच

शिरुर, ता.६ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) :  पत्ता विचारण्याचा बहाण्याने  बुलेट गाडीवरुन आलेल्या इसमांनी ५० हजार रुपयेची  रक्कम घेवून पोबारा केला.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास देवराम दरवडे (वय. ३३, रा. पेरणेगांव, ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. दरवडे हे रांजणगांव औद्योगिक वसाहतीत टाटा बॅटरी या कंपनीत कामाला आहेत.ते शुक्रवार (दि.५) रोजी सकाळी दहाच्या सुमारास शिरुर मधील जनता बॅंकेत कंपनीतील मिञाकडुन उसने घेतलेले पैसे भरायला आले होते. शिरुर मध्ये आल्यानंतर नवीन मार्केट यार्ड येथे आयडिया अॉफिस मध्ये मोबाईल बिल भरल्यानंतर पायी शिरुर कडे जात असताना पाबळ फाटा येथे आले असता, समोरुन बुलेट वर दोन अज्ञात इसम आले.त्यांनी साई व्हिला हॉटेल कुठे आहे असे विचारत तु कुठे राहतो, कंपनीत काम करतो का अशी चौकशी करत त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देउन गळा भेट घेतली.त्यावेळी दरवडे यानी त्याला बाजुला ढकलत ठिक आहे असे म्हटले.तर बुलेट वरील चालकाने, ए त्याला कशाला ञास  देतोस असे म्हणत दोघेही गाडीवरुन पसार झाले. या वेळी दरवडे ने  पॅंट चे खिसे तपासले असता खिशातील ५० हजार रुपये व आधारकार्ड चोरी गेल्याचे लक्षात आले.

या घटनेचा तपास नितीन  गायकवाड हे करत आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरात बुलेट वरून येवून पत्ता विचारण्याचा बहाण्याने लुटल्याचे तीन प्रकार घडले असून हा चौथा प्रकार घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे .त्यातच घरफोडी चे व चोरींचे प्रकार ही वाढत असून मागील आठवडात शहर परिसरातील वाढत्या गुन्हा बाबत चिंता व्यक्त करित  विविध संघटनाच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदनात देण्यात आले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या