शिरूर तालुक्यातील पाच गावात जमावबंदीचा आदेश

कोरेगाव भीमा, ता.६ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) :  कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद आगामी काळात उदभवू नयेत म्हणून कायदा व सुव्यवस्था यांचे दृष्टीने खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने शिरूर तालुक्यातील पाच गावात बुधवारपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

अपर जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय दंडाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर व कोंढापुरी या पाच गावात कलम 144 (3) अंतर्गत जमावबंदीचा आदेश दिला आहे. सदर गावात शुक्रवार (ता. 5) ते बुधवार (ता.10) पर्यंत एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

कोरेगाव भिमात  सध्या वातावरण निवळले असले तरी त्या अनुषंगाने अद्याप अनेक व्यक्ती एकत्र येवून सार्वजनिक रस्त्यावरून जाणेच्या बेतात असून त्यांचे दंग्यात किंवा दंगलीत रूपांतर होण्याची शक्यता असल्याचे पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱयांना कळविले आहे. त्यानुसार कोरेगाव भीमा येथील परिस्थिती पुन्हा उदभवू नये व कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सदर पाच गावांत जमावबंदीचा आदेश उपविभागीय अधिकाऱी श्री गलांडे यांनी जारी केला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितली. मात्र, सदर आदेशामधून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा, शाळा, कॉलेज, अंत्ययात्रा, धार्मिक विधी व समारंभ तसेच सार्वजनिक वाहतूक व सर्व सरकारी, निम सरकारी कार्यालये आणि बॅंका वगळण्यात आल्याचे श्री. गलांडे यांनी जाहीर केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या