शिरुरच्या तहसिलदारांचा 'तो' फोटो सोशल मिडियावर 'हिट'

शिरुर, ता. ७ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : कोरेगाव भीमा दंगली दरम्यान शासकिय बंदोबस्तावर असणा-या शिरुर च्या तहसिलदारांनी काढलेल्या त्या छायाचिञाचे प्रसारमाध्यमांसह नेटिझन्सनी कौतुक केले आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दंगल उसळली होती. या दंगलीचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटले.अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाउ नये म्हणून शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर यांसह पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचा-यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. दंगलीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शिरुरचे तहसिलदार हे घटना घडल्यापासून काही वेळातच घटनास्थळी हजर झाले होते. एकिकडे प्रचंड जमाव प्रक्षुब्ध झालेला असताना दुसरीकडे जाळपोळ, वाहनांची नासधुस केली जात होती.समोरील चिञ हे अतिशय भयानक असताना भारतीय राष्ट्रध्वज हाती घेउन एक आजोबा दंगल उसळलेली असताना रस्त्यावरुन जात होते.याच प्रसंगाचे शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांनी काही क्षण कॅमे-यात कैद केले आहे.
संपुर्ण राज्यभर कोरेगाव भीमा प्रकरणावरुन वाद निर्माण झालेला असता तिरंग्याच्या या अतिशय बोलक्या चिञाचे राज्यभरातील नेटिझन्सकडून कौतुक होत  असुन शांततेचा संदेश देणारं याहुन बोलकं चिञ कोणतं असू शकतं अशा प्रकारच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

याबाबत तहसिलदार भोसले यांनी बोलताना सांगितले कि, घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण होते. परंतु एक आजोबा त्या तणावाच्या परिस्थितीतही तिरंगा घेउन फिरत होते. त्या क्षणी फोटो काढावा वाढला.राज्याला शांततेचा संदेश देणारे याहुन बोलकं चिञ कोणतंच नसावे अशा प्रतिक्रिया तहसिलदार रणजित भोसले यांनी दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या