...अन् 'त्या' अभिनेञीलाही झाले अश्रू अनावर

मांडवगण फराटा, ता.८ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : शहीद वीर जवानाच्या कुटुंबियांचा सन्मान करताना मराठी अभिनेञीला अश्रू अनावर झाले होते.

मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे गुणवंतांचा सन्मान मांडवगण फराटा ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन सिनेअभिनेञी पुनम कापसे या उपस्थित होत्या त डॉ. अखिलेश राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी मांडवगण फराटा येथील सर्वसामान्य कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांपासुन आबालवृद्धांपर्यंत तसेच सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, प्रशासकिय,साहित्य, उद्योग, देशसेवा, आदी विविध क्षेञात उल्लेखनिय कार्य करणा-या गुणवंतांचा सन्मान शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला.मांडवगण फराटा येथील देशसेवा बजावताना शहीद झालेला सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांचा सन्मान करत असताना सिनेअभिनेञी पुनम कापसे यांच्यासह ग्रामस्थांनाही अश्रु अनावर झाले होते. या वेळी बोलताना डॉ. अखिलेश राजुरकर हे म्हणाले कि, हा सन्मान तळागाळातुन मोठ्या कष्टाने व जिद्दीने ध्येयाकडे वाटचाल करणा-या ख-या अर्थाने ख-या गुणवंतांचा सन्मान ग्रामस्थांनी केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच या गावाने जे मला भरभरुन प्रेम दिले ते मी ऋण कदापी विसरु शकणार नसुन सिनेअभिनेञी पुनम कापसे या बोलताना म्हणाल्या कि या गावात मला वेगळाच एकोपा पहावयास मिळाला असुन या गावाचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा असे मत कापसे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुञसंचालन संतोष परदेशी यांनी केले.मान्यवरांचे स्वागत माजी पं.स.सदस्य लक्ष्मण फराटे यांनी तर प्रास्ताविक सुधीर फराटे इनामदार यांनी केले.या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह विविध क्षेञातील मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.

सत्कार केलेले मान्यवर पुढीलप्रमाणे :
आदित्य जगताप (शैक्षणिक), तेजस संतोष फराटे (क्रिडा), धनश्री संदिप फराटे (शैक्षणिक), भरत गोपाळ मोरे (क्रिडा), दत्ताञय चौगुले (दुग्धव्यवसाय), श्रीनिवास दत्ताञय कदम, प्रशांत खंडेराव पवार (क्रिडा), निलम दिपकराव जगताप (क्रिडा), अक्षय अप्पासाहेब फराटे (क्रिडा), संध्या प्रकाश भोंगळे (क्रिडा), पुजा शांताराम कोळपे (क्रिडा), आदर्श गुंड (क्रिडा), तात्यासो बाळासो कोळपे (क्रिडा), सारंग रामदास फराटे (कला), शिवाजी जगताप(क्रिडा), संतोष नागवडे (विमा ग्राम), तृप्ती ञिंबक गायकवाड (क्रिडा), जयंत अशोक वेदपाठक (प्रशासकिय), वाघेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी (कृषी),प्रियंका धेंडे (प्रशासकिय), ञिशुल तावरे (प्रशासकिय), प्रशांत अशोक थोरात (कला), स्वप्निल सातव (विधी-कायदा), अलका शरद रसाळ (साहित्य), कवी मनोहर परदेशी (साहित्य), बाळासाहेब शिंदे (प्रशासकिय), विकास अडसुळ (प्रशासकिय), दादासाहेब उदमले (शैक्षणिक व क्रिडा), अंकुश जगताप (सामाजिक), डॉ.ज्ञानदेव फराटे (शैक्षणिक), राजीव वसंतराव फराटे (शैक्षणिक), डॉ.धनंजय शिंदे(वैद्यकिय), शितल घाडगे (प्रशासकिय), राणीताई जगताप (प्रशासकिय), दशरथ फराटे (प्रशासकिय), बाळासाहेब दयाराम नाईक (प्रशासकिय), अर्जुन बोञे (प्रशासकिय),बापुराव कुरुमकर (प्रशासकिय), सुनिल मारुती राउत (प्रशासकिय), मोहन राजाराम परदेशी (प्रशासकिय), प्रकाश कुतवळ (उद्योग), विठ्ठल उदमले (प्रशासकिय), लक्ष्मण थोरात (प्रशासकिय), शहिद सौरभ फराटे (देशसेवा)

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजीव फराटे,सुधीर फराटे, अजित पवार,राहुल फराटे, प्रविण जगताप, योगेश फराटे,सरपंच शिवाजी कदम, बाजारसमितीचे संचालक पांडुरंग फराटे, हनुमंत फराटे,उपसरपंच सुभाष फराटे,संतोष वसंतराव फराटे, भाउसो सोनवणे,सुधीर मचाले,गणेश फराटे, भाजपा युवा मोर्चाचे किशोर फराटे, गोरक्ष शितोळे, यशवंत गायकवाड, अनिल जगताप, गणेश लगड आदींनी परिश्रम घेतले.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या