शिरूरच्या सेतू केंद्रामध्ये नागरिकांना धरले जाते वेठीस

शिरूर, ता. 8 जानेवारी 2018 (संपत कारकूड): शिरूर सेतू केंद्रामध्ये नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा कौल शिरूरकरांनी दिला आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱया www.shirurtaluka.com ने शिरूरमधील सेतू केंद्राबाबत मालिका सुरू केली आहे. शिवाय, संकेतस्थळाने नागिरकांचे मत जाणून घेण्यासाठी मतचाचणीही घेतली होती. मतचाचणीमध्ये 100 टक्के मत नोंदविताना नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचे शिरूरकर सांगतात. परंतु, संबंधित बाब अधिकाऱयांच्या लक्षात येऊ नये ही शोकांतिका आहे.
संकेतस्थळाने 1 ते 7 जानेवारी दरम्यान घेतलेली मतचाचणी पुढीलप्रमाणे-
शिरूरच्या सेतू केंद्रामध्ये नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असे आपणास वाटते काय?
1) होय - 100 टक्के
2) नाही - 0 टक्के
3) माहित नाही - 0 टक्के

शिरूर तालुक्यातील नागरिक जर वेठीस धरत असल्याचे सांगत असतील तर ते सेतू केंद्र काय कामाचे? संबंधित अधिकारी काय झोपले आहेत का? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. अधिकाऱयांनी याबाबतीत लवकरात लवकर लक्ष घालावे, अन्यथा नागरिकांचा उद्रेक केंव्हाही होऊ शकतो.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या