आमदार बाबुराव पाचर्णेंनी दिलेला शब्द केला खरा

शिरुर,ता.८ जानेवारी २०१८(सतीश केदारी) : शिरुर शहरातील तहसिल कार्यालयाजवळ पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आमदार पाचर्णेंनी दिलेला शब्द खरा केला असुन नुकतचं त्या ठिकाणी कामही सुरु करण्यात आलं आहे.
सविस्तर असे कि, शिरुर शहरातील तहसिल कार्यालयाजवळील जागेत स्वातंञ्यदिनी व प्रजासत्ताक दिनी तसेच महाराष्ट्रदिनी ध्वजवंदन केले जाते.या ठिकाणी जागा आहे परंतु बसण्यासाठी चांगली व्यवस्था करावी, पेव्हिंग ब्लॉक बसवावेत अशी मागणी शिरुर शहरातील नागरिकांनी शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे स्वातंञ्यदिनी केली होती.त्यावेळी आमदार पाचर्णेंनी याबाबत नागरिकांची बैठक घेउन ध्वजस्तंभाजवळील जागेत प्रजासत्ताक दिनापर्यंत पेव्हिंग ब्लॉक, बसण्यासाठी चांगली सुविधा निर्माण करण्याचा शब्द दिलेला होता.हा दिलेला शब्द सार्थ ठरवत पाचर्णेंनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतुन ५१ लाख ७५ हजार रुपये निधी मंजुर केला.इतकेच नव्हे तर लगेच भुमिपुजन करुन कामही सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नागरिकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था होणार आहे.याबाबत शिरुर मधील अनेक  नागरिकांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.

या भुमिपुजन प्रसंगी बोलताना पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांनी शिरुर-हवेलीत आमदार पाचर्णे यांच्यामुळे कोटींची विकासकामे सुरु झाले असल्याचे सांगत विकासपर्वच असल्याचे प्रतिपादन सरोदे यांनी केले.

या वेळी शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार, पं.स सदस्य राजेंद्र गदादे, विक्रम पाचुंदकर, नगरसेवक मंगेश खांडरे, संदिप गायकवाड, नितीन पाचर्णे, अभिजित पाचर्णे खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोणवणे, भाजपाचे दिलीप हिंगे, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, माजी पं.स.सदस्य दादा पाटील घावटे, माजी सरपंच अरुण घावटे, तर्डोबाची वाडीच्या सरपंच वर्षा काळे, उपसरपंच संभाजी कर्डिले, माजी सरपंच सुरेखा कर्डिले, रामलिंग चे उपसरपंच विठ्ठल घावटे, भाजपाचे बाबुराव पाचंगे, राजु शेख, योगेश कर्डिले,शरद पाचर्णे, नामदेव जाधव, दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय मुरकुटे, बांधकाम विभागा चे स्थापत्य अभियांञिकी सहायक एम.बी.कांबळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या