सोशल मिडीयावर 'मेरी बेटी मेरा अभिमान' चा ट्रेंड

शिरूर,ता.९ जानेवारी २०१८(संदीप घावटे) : सोशल नेटवर्किंग साइट्सवर मेरी बेटी-मेरा अभियान ट्रेंड चांगलाच व्हायरल होत असुन अनेक नेटीझन्सचा याचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

सध्या सर्वत्र सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे . अनेक भल्या बुऱ्या गोष्टीबद्दलची माहिती समाजात क्षणार्धात पसरली जाते.सध्या सोशल मिडीया फेसबुकच्या माध्यमातून' मेरी बेटी मेरा अभिमान' या शीर्षकाचे फेसबुक प्रोफाईल फोटो मोठया प्रमाणात झळकताना दिसत आहेत.आजच्या विवाहित तरुण पिढीसाठी मुलगा मुलगी एक समान याचे प्रबोधन बऱ्यापैकी झाले आहे असे वाटते. मुलगाच हवा,मुलगा वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी म्हणजे मुलगा यासाठीचा अट्टाहास कमी होताना दिसतोय.आजच्या काळात विविध झेंडे, महापुरुष यांचे प्रोफाईल फोटो ठेवण्याची क्रेझ असताना मेरी बेटी मेरा अभिमान ही मोहीम सोशल मिडियावर भलतीच भाव खात आहे.

शासनाच्या वतीने स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी केलेली कडक उपाययोजना व त्याची अंमलबजावणी तसेच प्रबोधन यामुळे स्त्री जन्मदर वाढण्यास नक्कीच मदत होत आहे.सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनेक सण, राष्ट्रीय उत्सव, नवीन वर्ष प्रसंगी विविध घोषवाक्य असलेले अनेक प्रोफाईल फोटो बनवण्याची संधी वापरकर्त्यांना दिली जाते. आता तर पोटी मुलगी  जन्मल्या याचा पालकांना अभिमान वाटतो तो या प्रोफाईल फोटोच्या माध्यमातून जाणवतो आहे.

फेसबुक वापरणाऱ्या अनेकांनी मेरी बेटी मेरा अभिमान या घोषवाक्याचा वापर करून मुलगा मुलगी एक समान, बेटी बचाओ या शासनाच्या अभियानाला नकळत पाठींबा दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या