पोलीस फौजफाट्यासह 'ते' आरोपी कोर्टासमोर हजर

शिरुर, ता. ९ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : कोरेगाव भीमा प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपीना १२ जानेवारी पर्यंत पोलिस कोठ्डी सुनावली असल्याची माहिती सुञांनी दिली.

कोरेगाव भीमा प्रकरणातील अटक केलेल्या तीन आरोपीना सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात  न्यायालयात आणण्यात आले. या आरोपीना १२ जानेवारी पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान वढु बुद्रूक प्रकरणातील ६ आरोपीना १० जानेवारी पर्यत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली. सोमवारी (ता.८) रोजी सायंकाळी ५ च्या नंतर या आरोपीना प्रचंड पोलिस बंदोबस्तात शिरुर न्यायायलयात आणण्यात आले.  यावेळी न्यायलयाबाहेरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

डीवायएसपी बापू बांगर, शिरुरचे पोलिस निरिक्षक राजेंद्र कुंटे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. शीघ्र कृती दलाचा तुकड्या व दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव दल आदीची पथके यावेळी तैनात करण्यात आली होती.आरोपीची सुनावणी झाल्यानंतर पुन्हा जाताना ही मोठा पोलिसांचा फौजफाटा आरोपीच्या वाहनांसमवेत होता.दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा परिसराला भेट देवून माहिती घेतली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या