राहुल फटांगडेच्या कुटुंबियास शासनाकडून १० लाखांची मदत

कोरेगाव भिमा, ता.९ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : सणसवाडी(ता.शिरुर) येथील दंगलीतील दुर्दैवी राहुल फटांगडेच्या कुटुंबियास शासनाने जाहिर केल्याप्रमाणे  १० लाखांच्या मदतीचा धनादेश सुपुर्त केला आहे.
सविस्तर असे कि, कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी दंगल उसळली होती.त्यानंतर त्या घटनेचे लोण सणसवाडी येथेही पोहोचले होते.व त्याच ठिकाणी  दंगल उसळल्यानंतर सणसवाडी येथील तरुण राहुल फटांगडे या तरुणाचा दंगलीत दुर्दैवी मृत्यु झाला होता. राहुल फटांगडे हा घरातील कर्ता पुरुष असल्याने त्याच्यावरच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती.यानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने मदतीची घोषणा केली होती.शासनाने जाहिर केल्याप्रमाणे आज मंगळवार(दि.९) रोजी फटांगडे कुटुंबियांची भेट घेउन १० लाख रुपये मदतीचा धनादेश मयत राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियांकडे सुपुर्त केला.

या वेळी शिरुर चे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलंडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पठारे, शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले आदी उपस्थित होते.

शासनाने जाहिर केल्याप्रमाणे घटनेनंतर नवव्या दिवशीच तत्काळ मदत दिल्याने अनेकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या