राहुल फटांगडे खून प्रकरणी तीन आरोपींना अटक

शिरुर, ता.१० जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : सणसवाडी (ता. शिरुर) येथे जाळपोळ व दगडफेकीत राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याच्या मृत्युप्रकरणी पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आज (बुधवार) संध्याकाळी त्यांना शिरुर न्यायालयासमोर उभे केले असता पंधरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
१ जानेवारी रोजी सणसवाडी येथील युवक राहुल फटांगडे याचा दंगलीत मृत्यु झाला होता.आज बुधवार (दि.१०) रोजी त्याचा दशक्रिया विधी होता. राहुलच्या मारेक-यास अटक करा अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार पोलीसांनी विविध माध्यमांतून तांञिकपणे तपास करत नगर जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक केली. सदर आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांनीे दिली.

बुधवारी (दि. १०) सायंकाळच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात शिरुर न्यायालयात या आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. तर सणसवाडी येथील दंगलीतील पाच आरोपींना कोर्टाने १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली.

सणसवाडी तील मयत राहुल फटांगडे याच्या खून प्रकरणातील पकडलेल्या आरोपींना न्यायालयात आणले त्या वेळेस आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालयासमोर गर्दी केली  होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या