राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिरुरला अभिवादन

शिरुर,ता.१२ जानेवारी २०१८(प्रा.सतीश धुमाळ) : शहरातील विविध संस्था व संघटनाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

शिरुर शहरातील पुणे नगर रोडवरील हॉटेल आस्वाद जवळ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या हस्ते मांसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे कार्य जिजाऊनी केले.त्याच्या जीवनकार्याचा अभ्यास करावा.शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक संजय देशमुख म्हणाले की, जिजाऊच्या विचारांचा वारसा हा या पिढीने घेणे गरजेचे असुन हा वारसा अखंडितपणे पुढे चालवावा.

या प्रसंगी नगरसेवक विनोद भालेराव, मोहम्मद हुसेन पटेल आदींनी मनोगते यावेळी व्यक्त केली तर नगरसेवक मंगेश खांडरे, नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदिप बारवकर, कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष किरण आंबेकर, शिक्षण मंडळाचे  सभापती संतोष शितोळे, निलेश खाबिया, अविनाश मल्लाव, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे,फिरोजभाई बागवान,क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, मनसेचे शहराध्यक्ष सुशांत कुंटे,बिजवंत शिंदे, डॉं नारायण सरोदे,गणेश खोले, सतीश गवारी,माजी सरपंच विलास पोटे,अविनाश घोगरे,खुशाल गाडे,रमणलाल भंडारी आदींसह शिरुर शहरातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रा. सतिश धुमाळ यांनी तर स्वागत अनिल बांडे यांनी केले.सूत्रसंचालन बाळासाहेब ओस्तवाल केले तर आभार बाबूराव पाचंगे यांनी मानले.


मराठा महासंघाच्या महिलांकडुन अभिवादन
शिरुर शहरातील हुडको कॉलनी येथे महिलांनी जिजाउंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षा शोभना पाचंगे, तालुकाध्यक्ष जिजाताई दुर्गे, उपाध्यक्ष प्रतिभा फंड, सोनाली सरोदे, अनुकंपा वाखारे,पार्वती कानडे, शिला पाटील, डॉ.प्रियंका पोटघन, स्वाती कवितके, सुचिञ सावंत आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या