धुमस्टाईल चोरट्यांचा शिरुर शहरात धुमाकूळ सुरुच...

शिरुर,ता.१४ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर शहरात दुचाकीस्वारांकडुन नागरिकांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटुन पसार होणा-या धुमस्टाईल चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच असुन  प्रकार सुरुच असुन शनिवारी (दि.१३) एका नागरिकाचे २५ हजार रुपये भर गर्दीत चोरल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी मच्छिंद्र हरिभाउ गाडे(वय.३८,रा.कर्डे) यांनी फिर्याद दिली आहे .शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे हे नामदेव बोडके यांच्यासोबत शिरुर ला आले होते.इंदिरा गांधी पुतळ्याजवळ आल्यानंतर गाडीवरुन खाली उतरले असता,दुचाकी वरुन आलेल्या इसमांपैकी एकाने पत्ता विचारण्याचा बहाना केला.तेव्हा फिर्यादी गाडे यांनी त्या इसमाला मला माहित नाही असे सांगितले. त्यानंतर त्या अनोळखी इसमाने हस्तांदोलन करुन अलिंगन दिले व गावाचे नाव विचारले.तसेच फिर्यादी यांच्या पायाला पकडले व पाय हलवला.समोर उभ्या असणा-या मोटारसायकलवर दुसराही इसम उभा होता.त्याच्या पाठीमागे बसुन ते दुचाकीस्वार पसार झाले. यावेळी फिर्यादी गाडे यांनी खिसे तपासले असता खिशातील २५ हजार रुपये रक्कम चोरी गेल्याचे लक्षात आले.यानंतर गाडे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे धाव घेउन अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

शिरुर शहरात अशाच पद्धतीने दुचाकीस्वारांनी नागरिकांना लुबाडण्याची हि सहावी घटना घडली आहे. हे चोरटे दुचाकीवर येतात.हस्तांदोलन करुन नकळत खिशातील पैसे काढुन धुमस्टाईल पद्धतीने पळून जाण्यात यशस्वी होतात. नागरिकांनी गर्दीत सावधानता बाळगावी, अनोळखी व्यक्तींपासुन सावध राहावे. संशयित व्यक्ती आढळल्यास पोलीसांशी तत्काळ संपर्क साधावा. जास्त रक्कम असल्यास काळजी घ्यावी असे आवाहन शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केले आहे.

शिरुर पोलीसांची तपास पथके  या चोरांचा तपास करत आहेत. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, फौजदार सोमनाथ वाघमोडे आदींसह शिरुर पोलीसांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन शिरुर शहरासह परिसरात कसुन चौकशी सुरु केली आहे. या चोरांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असे पोलीसांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या