विद्याधाम प्रशाला देवदैठणने पटकावला 'मल्हार करंडक'

शिरुर, ता.१४ जानेवारी २०१८ (प्रा. संदिप घावटे) : जेएसपीएम कॉलेज वाघोली आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतील मानाचा प्रथम क्रमांकाचा 'मल्हार करंडक' श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेने पटकाविला आहे.


जेएसपीएम कॉलेजच्या वतीने राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन केले होते .यात जवळ जवळ शंभर शाळांचा समावेश होता. प्रशालेने राज्यस्तरीय या स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसे पटकावून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.या स्पर्धेत खेळाडूंनी पुढील बक्षिसे प्राप्त केली .

कबड्डी मुली - प्रथम क्रमांक, कबड्डी मुले -द्वीतीय क्रमांक, रस्सीखेच मुले - प्रथम क्रमांक, रस्सीखेच मुली - तृतीय क्रमांक, लेझीम पथक - द्वीतीय क्रमांक, दमशराज- द्वितीय क्रमांक, विज्ञान प्रदर्शन - प्रथम- वैभव सातव, पोस्टर पेंटींग - प्रथम - प्रसाद भालेकर ,
गीत गायन  - प्रथम - निकिता बनकर, निबंध लेखन - द्वितीय क्रमांक - दिव्या कौठाळे , १०० मी धावणे प्रथम - वैष्णवी वाघमारे , १०० मी धावणे, द्वितीय - हर्षदा ढवळे , २०० मी धावणे ,प्रथम -शुभांगी वाखारे, ४X१०० मी रिले मुली प्रथम क्रमांक - मयुरी वाघमारे, हर्षदा ढवळे, वैष्णवी वाघमारे, शुभांगी वाखारे.

प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी शेळके यांना 'स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार' देऊन रोख दहा हजार व ढाल प्रदान करण्यात आला.या विजेत्यांना  रोख रक्कम व चषक उपसरपंच पुजा वसंत बनकर, शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र भटेवरा, राजेंद्र दुगड, जेएसपीएमच्या सोनाली गायकवाड, शिरूरचे मुख्याध्यापक डी .एन खरमाटे, कुकडीचे संचालक सुभाष वाघमारे, सदस्य निलेश गायकवाड, वसंत बनकर, लक्ष्मीकांत दंडवते, बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजया नितनवरे यांनी केले तर आभार संदीप घावटे यांनी मानले.

विद्याधाम प्रशालेची विविध क्षेत्रातील कामगिरी पाहून गावच्या नवनियुक्त उपसरपंच पुजा वसंत बनकर यांनी लेझीम पथकासाठी लेझीम घेण्यासाठी चार हजार रुपये देणगी यावेळी जाहीर केली.विद्याधाम प्रशाला देवदैठण चे मुख्याध्यापक संभाजी शेळके यांना मिळालेली पुरस्काराचे दहा हजार रूपये त्यांनी  शाळेच्या कला- क्रीडा विभागाच्या विकासासाठी कला अध्यापक संदीप वेताळ यांच्याकडे सुपुर्द केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या