राहुल फटांगडे खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

शिरुर,ता.१५ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : सणसवाडी (ता.शिरुर) येथे दंगलीत दुर्दैवी मृत्यु झालेल्या राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याच्या मृत्युप्रकरणी पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली होती.या आरोपींना आज (सोमवारी) संध्याकाळी त्यांना शिरुर न्यायालयासमोर हजर केले असता सतरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

कोरेगाव भिमा येथे दंगल उसळल्यानंतर जाळपोळ व दगडफेक करण्यात आली होती.त्याच दिवशी (१ जानेवारी) रोजी सणसवाडी येथील युवक राहुल फटांगडे याचा दंगलीत मृत्यु झाला होता.त्यानुसार पोलीसांनी विविध माध्यमांतून तांञिकपणे तपास करत नगर जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक केली होती व त्यांना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत न्यायालयाने १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार आज सोमवारी(दि.१५) रोजी पोलीस कोठडी संपल्याने या खुनातील आरोपींना सायंकाळच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात शिरुर न्यायालयात या आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.या वेळी पोलीसांनी न्यायालय आवारात चोख बंदोबस्त ठेवला होता.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या