ज्ञानपीठ फाउंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पुणे,ता.१७ जानेवारी २०१८(सतीश केदारी) :  ज्ञानपीठ फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असून राज्यस्तरीय साहित्य प्रतिभा गौरव पुरस्कारासाठी गजलकार विजय वडवेराव यांची तर प्रेरणा पुरस्कारासाठी कवी बालाजी पेटेकर, निशांत पवार, सिंधूताई दहिफळे, प्रज्ञा शिंदे, विष्णू जगळपुरे, श्रावणी दवणे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक कुमार अभंगे, अनुराधा हवेलीकर यांनी दिली आहे.


प्रा. महादेव रोकडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने नुकतीच निवड जाहीर केली. सुप्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

नांदेड येथे २८ जानेवारी रोजी होणाऱ्या मिलाप या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि गझलकारांचा कविता गजलांची सुरेल मैफल हा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त काव्य प्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक कुमार अभंगे, अनुराधा हवेलीकर, किर्ती हरिभक्त, प्रवीण भाकरे, स्वागताध्यक्ष डॉ.श्याम पाटील तेलंग यांनी केले आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.महेश मोरे, प्रा.शंकर विभूते, दीपक सपकाळे, व्यंकटेश काटकर, शिवाजी होळकर,प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, बालाजी पोगुलवाड, अनिल बलखंडे, रघुनाथ पोतरे, संदीप भुरे, सतीश केदारी, भारत कांबळे, सुनील पाटील, प्रणव बोडके, गजानन सावंत, अमित पवार, लखन कावळे यांच्यासह अनेकजण परिश्रम घेत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या