करडेत रंगणार शिरुर तालुका मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा (Video)

करडे,ता. १७ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : करडे येथे रविवार (दि.२१) पासून शिरुर तालुका मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे (पाटील) यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, करडे येथे रविवार दि. २१ पासुन मंगळवार दि.२३ पर्यंत शिरुर तालुका मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा आयोजित केली असुन रविवारी वजने घेतली जाणार असुन वजन मर्यादा ७५ ते १२५ किलो असनार आहे.बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या वतीने मल्लसम्राट विजेत्यास चांदीची गदा देण्यात येणार असून गणेगाव खालसाचे सरपंच रमेश तांबे यांच्या कडून बुलेट गाडी भेट देण्यात येणार आहे.तसेच उपविजेत्यास गणेश बेंद्रे यांच्याकडुन स्पेंडर गाडी भेट देण्यात येणार आहे. विजेत्यास उद्योजक प्रफुल्ल लुंकड यांच्याकडुन रोख १५,५५५ रुपयाचे तर उपविजेत्यास ११,१११ रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे. करडे, लंघेवाडी व चव्हानवाडी ग्रामस्थांकडून विजेत्यास चषक देण्यात येणार आहे.

तीन दिवसीय दिवस-राञ अशापद्धतीने व प्रकाशझोतात सामने खेळवले जाणार असुन सहभागी मल्लांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामस्थांच्यावतीने पुरविल्या जाणार आहे. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे कुस्तीगीर संघाचे सचिव बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदिप भोंडवे, कार्याध्यक्ष विलास कथुरे, अॉलिम्पिकवीर मारुती आडकर, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव किसन बुचडे, तालुकाध्यक्ष कानिगनाथ गव्हाणे, आप्पासाहेब धुमाळ, तालुका सचिव झेंडू पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भव्य कुस्ती स्पर्धेला तालुक्यासह जिल्हयातील मल्लांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करडे ग्रामस्थांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या