राहुल फटांगडेच्या मारेक-यांना न्यायालयीन कोठडी

शिरुर,ता.१७ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : राहुल फटांगडे खुन प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.


सणसवाडी(ता.शिरुर) येथे १ जानेवारी रोजी दंगलीत राहुल फटांगडे याचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यु झाला होता.या प्रकरणी नगर जिल्हयातुन तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली होती.त्यानंतर न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली.

आज बुधवार(दि.१७) रोजी पोलीस कोठडी संपल्याने दुपारनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या