पिंपरखेडला महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

पिंपरखेड, ता.१८ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : महिलेशी असभ्य वर्तन केल्याने एकावर शिरुर पोलीस ठाण्यात एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी तुकाराम रोकडे हा गेले चार महिन्यांपासुन महिलेकडे पाहुन शिट्ट्या वाजवत व गैरवर्तन करत होता.परंतु पिडितेने याकडे दुर्लक्ष केले.(दि.१७) रोजी पिडिता ही एकटी असल्याचे पाहुन आरोपीने जवळ येउन महिलेशी असभ्य व मनास लज्जा उत्पन्न होइल असे वर्तन केले.दरम्यान महिलेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला.व पिडित महिलेने शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली.

या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार साबळे हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या