विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभार; आंदोलनाचा इशारा

तळेगाव ढमढेरे, ता. 19 जानेवारी 2018 (एन. बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरेच्या रामवाडी येथील रोहित्रात महिन्याभरात तीनवेळा बिघाड झाला होता. याबाबत येथील नागरिकांनी तोंडी तक्रारी दिल्या असूनही संबधित विभागाने याची दखल घेतली नाही. येत्या दोन दिवसांत रोहित्र न बसवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी विद्युतमहामंडळाला दिले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील रामवाडी येथे महिन्यात तीनवेळा रोहित्र जळाल्यामुळे यथील नागरिकाना विजेविना राहण्याची वेळ आली असून, याबाबतच्या तक्रारी येथील नागरिकांनी देऊनही संबंधित विभागाने येथे येऊन तपासणी केली नसल्याचे तालुकाध्यक्ष नरके यांनी निवेदनात म्हटले आहे. महिन्यात तीनवेळा रोहित्र जळत असतानाही कर्मचारी व अधिकार्यांनी रोहीञाची तपासणी न करताच बसवल्याने बिघाड तसाच राहिल्यामुळे रोहित्र बसवल्यानंतर पाच तासांत बिघडला. यामुळे येथील रोहित्रावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व नागरिकांना आर्थिक तोटा होत आहे तसेच येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे येथील नागरिक महावितरणच्या कारभाराला वैतागले आहेत. याबाबत तळेगाव ढमढेरे येथील वीजवितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता अलदार यांना या विद्युत रोहित्राबाबत विचारले असता दोन दिवसात काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्येही वीजेचा नेहमीचा प्रश्न आहे. अनेकदा अधिकाऱयांना भेटूनही वीजेचा प्रश्न सुटत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. यामुळे महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या