सणसवाडीत अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबारात एकाचा मृत्यू

सणसवाडी, ता.१९ जानेवारी २०१८ (विशेष प्रतिनीधी) : सणसवाडी(ता.शिरुर) येथे अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली असून शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंगाराम बाबुराव दासरवाडगंगाराम बाबुराव दसरवाड वय (वय.३० मुळगाव.शिकारा, मुखेड, जिल्हा नांदेड) यांचा मृत्यु झाला आहे.गंगाराम हा  आज सकाळी ११.३० सुमारास कंपन्याना दुध देऊन सणसवाडी फाट्यावरून  सणसवाडी गावाकडे दुचाकी स्कुटर वरून  जात असताना सणसवाडी गावाजवळील दशक्रिया घाट जवळ आल्यावर मोटार सायकल वरुन आलेल्या हेल्मेटधारक दोन इसमांनी गोळ्या घातल्या. यावेळी तो जागीच कोसळला. गोळ्या चालणारे अज्ञात इसम हे सणसवाडी दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. या वेळी नागरिकांनी दासरवाड यांना अम्बुलन्स मध्ये घेऊन  सणसवाडी येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास नेत  असताना जास्त गंभीर जखमी असल्याने पुढील उपचार मिळण्यापुर्वीच मयत झाला.

या घटनेची माहिती मिळताच सणसवाडी येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.पोलीसांना घटनास्थगळाचा पंचनामा करताना एक रिकामी पुंगळी  सापडुन आली आहे.हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलीसांनी तातडीने पोलीस पथके रवाना केले आहे.

गंगाराम हा सणसवाडी येथे गेली १० वर्षांपासून राहत असून तो कंपन्यांमध्ये दूध व कॅन्टीन साठी चपाती ठेकेदार मार्फत पुरवण्याचे काम करत होता.१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे दंगल उसळलेली दंगल वातावरण शांत होत नाही तोवर गोळीबार प्रकरणाने सणसवाडी परिसर हादरून गेले आहे.एकेकाळी अतिशय शांत समजला जाणारा शिरुर तालुका गेल्या काही दिवसांत विविध घडलेल्या घटनांनी अशांत झाला असुन या घटनेने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या