दंगलीत व्यवसायच खाक झाल्याने उपचार कसे करु ?

मांडवगण फराटा, ता.२० जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : दहा वर्षापुर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले परंतु वैद्यकिय खर्च भागवण्यासाठी कोरेगाव भिमाला छोटा व्यवसाय सुरु केला. तो व्यवसायही दंगलीत पुर्णपणे जळुन खाक झाल्याने महागडा उपचारांचा खर्च करायचा कसा सवाल येथील गणेश घाटे याने केला आहे.
सविस्तर माहिती अशी की मांडवगण फराटा येथे फलटण तालूक्यातून आपल्या कुटंबासह उदरनिर्वाहासाठी मुरलीधर शंकर घाटे व राजश्री घाटे हे पती पत्नी मांडवगण फराटा येथे 1980 साली दोन मुले व एक मुलगी असा परीवार घेउन  राहण्यासाठी आले होते.त्यांनी मांडवगण फराटा येथे सुतारकाम व्यवसाय सुरू केला त्यातून येणारया उत्पन्नातून कुटंबाला हातभार लागल्यामुळे त्यांचा प्रपंच सुरळीत सुरू होता पण नियतीने मध्येच त्यांच्या सुखी प्रपंचावर घाला घातला. व त्यामध्ये हदयविकाराच्या झटक्यामध्ये  भानुदास घाटे यांचे दु:खद निधन झाले. त्यानंतर या दु:खातून  कसेबसे सावरून प्रपंचाला हातभार लागावा म्हणून या कुटूंबाने खाणावळीसह शेवया तसेच लग्नासाठी लागणारा रूखवत यासारखा छोटा व्यवसाय सुरू केला व यावरच कुटूंबाचा डोलारा सावरत एका मूलीचे लग्न केले. तर मुलालाही चांगले उच्च शिक्षण दिले. परंतू घरच्या आर्थीक अडचणीमुळे गणेशला चांगली नोकरी मिळू शकली नाही. दरम्यानच्या काळात गणेश हा वारंवार आजारी पडू लागला. याच वेळी कुटूंबाने चांगल्या दवाखान्यात आजाराचे निदान केले असता गणेशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले. हा धक्का कुटुंबासाठी मोठा होता. यानंतर गेले सात वर्षांपासून आजतागायत गणेशवर अत्यंत महागडा समजला जाणारा डायलिसीच्या उपचाराचा खर्च आजही त्यांचे कुटुंब मोलमजूरी करून खर्च भागवत आहे.

खरया अर्थाने या कुटुंबाला मदतीची गरज आहे गणेश देखील आपल्या कुटुंबाबरोबर मिळेल ते काम करत होता. गेल्या आठ महिन्यापूर्वी  गणेशने कोरेगाव भिमा येथे छोटा व्यवसाय सुरू केला होता पण मध्यंतरी झालेल्या दंगलीमध्ये याचा हा व्यवसायही जळून खाक झाला. यामुळे ज्या व्यवसायवर  गणेशचा उपचाराचा खर्च भागत होता त्या व्यवसायाची देखील राखरांगोळी झाल्यामुळे गणेशची सध्याची परीस्थीती हालाखीची झाली आहे. पण यातून सावरण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह मित्रांनी एकत्र येत त्याच्या उपचारासाठी आर्थीक स्वरूपातील हातभार लागावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
सतीश केदारी - 8805045495


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या