गणेगाव मॅरेथॉनला सर्वस्तरातून प्रचंड प्रतिसाद

गणेगाव खालसा, ता.२१ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित केलेल्या महामॅरेथॉन ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
गणेगाव खालसा येथे रविवार (दि.२८) रोजी होणा-या "गणेगाव रनर्स-गणेगाव हाल्फ मॅरेथॉन २०१८" महा-मॅरेथॉनला सर्व स्तरांतुन अॉनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करण्यात आली आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांव नंदणी करणे आवश्यक असल्याने शिरुर तालुक्यासह पुणे, सातारा, मुंबई, तसेच विविध भागातुन सुमारे २१०० जणांनी  अॉनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे.या स्पर्धेत ६ ते ७५ वयोगटातील महिलांसह पुरुष सहभागी होणार आहेत.त्याचप्रमाणे ज्यांना सहभागी होण्याची इच्छा आहे परंतु नावनोंदणी करता आली नाही अशा व्यक्तींसाठी दि.२७ जानेवारी रोजी स्पर्धेच्या ठिकाणी ४०० जणांना नांव नोंदणी करुन सहभागी होता येणार आहे.या स्पर्धेत १५० शिक्षक, ५० डॉक्टर, ३० उच्च दर्जाचे अधिकारी व ६० टक्के विद्यार्थी सहभागी होत असुन ४० टक्के महिलांनीही सहभाग घेतला आहे.खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ७५ महिला पोलीस अधिकारी यांनी सहभाग घेतला असुन तालुक्यातुन महिला, मुलींची संख्या लक्षणीय आहे.

गणेगाव खालसा येथे फ्री रनर्स व गणेगाव ग्रामस्थांनी मॅरेथॉन आयोजन करण्याचे हे दुसरे वर्ष असुन या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन मिळणार आहेच परंतु प्रत्येकाचे स्वास्थ टिकवण्यासाठी मदत होणार आहे.महा-मॅरेथॉनला सर्व स्तरांतुन अॉनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती संयोजकांनी दिली.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या