विलास कर्डिले यांच्यामुळे वाचणार अपघातग्रस्तांचे प्राण

सरदवाडी, ता.२२ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : सरदवाडी(ता.शिरुर) येथील विलास कर्डिले यांच्यामुळे पुणे-नगर महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळुन प्राण वाचणार आहेत.
पुणे-नगर महामार्गावर गेल्या काही दिवसांत तातडीचे उपचार मिळु न शकल्याने अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.त्याचप्रमाने या रस्त्यांवर वारंवार अपघात घडत असुन अनेक जखमी होतात.न्हावरे फाटा येथे काही महिन्यांपुर्वी मामा भाची चा अपघात झाला होता परंतु वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्या मुलीला प्राण गमवावे लागले होते.त्याचप्रमाणे कित्येक जीव हे वेळेत मदत मिळु न शकल्याने गेले आहेत.शिरुर ते कारेगाव दरम्यान वेळेत रुग्णवाहिका उपल्ब्ध होत नसल्याने जखमींचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात.या सर्व गोष्टींचा विचार सामाजिक भान राखत सरदवाडी येथील आदर्श सरपंच विलास कर्डिले यांनी स्वखर्चातुन वडील मारुती धोंडिबा कर्डिले व प्रसिद्ध उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ नुकतीच रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.या रुग्णवाहिकेचे लोकापर्ण प्रसिद्ध उद्योजक प्रकाशशेठ धारिवाल यांच्या हस्ते केले जाणार आहे.या मुळे या रस्त्यावर कोठेही अपघात घडल्यास तत्काळ मदत मिळणार असुन कित्येक जखमींचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

आदर्श सरपंच विलास कर्डिले हे समाजकार्यात नेहमी पुढाकार घेत असुन त्यांच्या या कार्याचे तालुकाभर कौतुक आहे.त्यांनी सरदवाडी गावात विठ्ठलमंदिरात या पुर्वी रंगरंगोटी, एल.इ.डी स्क्रिन, ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी बाके,भैरवनाथ मंदिराचे सभामंडप,विद्युत फिटिंग इ.समाजहिताची कामे केली असुन सरदवाडीतील सुमारे ३५० नागरिकांना नुकतीच धार्मिक स्थळांची परिक्रमा घडवुन आणली आहे.

पुणे नगर रस्त्यावर कोठेही अपघात घडल्यास अपघ्या काही मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणार  असल्याचे कर्डिले यांनी बोलताना सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्कः
विलास कर्डिले : 9225546419

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या