सांगलीतल्या पैलवानांसाठी सरसावले शिरुरचे पैलवान

शिरुर, ता. २३ जानेवारी २०१८(प्रतिनीधी) : लाल मातीसाठी आयुष्य पणाला लावत आकस्मिक मृत्यु पावलेल्या सांगलीतील पाच पैलवानांच्या कुटुंबासाठी आर्थिक हातभार लागावा यासाठी शिरुर शहरातील लाल माती प्रतिष्ठाणने पुढे येत सुमारे ५० हजार रुपये पैलवान ग्रुपचे पैलवान विलास देशमुख यांच्याकडे नुकतेच सुपुर्त करण्यात आली.
काही दिवसांपुर्वी क्रांती आखाडा,कुंडल येथील पैलवान औंध येथील कुस्ती स्पर्धा संपवुन येत  असताना त्यांच्यावर काळाचा घाला घातला.व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.या घटनेमुळे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेञावर शोककळा पसरली.तसेच या कुस्ती पैलवानांच्या दुर्दैवी मृत्युमुळे कुटुंबाला आर्थिक मदत  व्हावी या असा विचार पवार यांनी शिरुर मधील मिञांसमोर मांडला.त्यावेळी सर्वांनी होकार देत एकुण ५० हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली.

जमा केलेली हि रक्कम पैलवान ग्रुपचे पैलवान विलास देशमुख यांच्याकडे नुकतेच सुपुर्त करण्यात आली.या वेळी शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे,शिरुर केसरी अशोक पवार, पुणे केसरी बालाजी गव्हाणे, हरिभाउ पाचुंदकर, किरण पठारे, शिरुर केसरी अविनाश गवारी, शिरुर केसरी जयदिप बेंद्रे, आशिष शिंदे, बाळासाहेब दौंडकर, सचिन घावटे, गणेश काळे, गणेश सरोदे, विजय गडदरे, प्रशांत चोरे, पप्पु पवार, राजेंद्र बोर्डे, बंडू गिरी, कानिफ गव्हाणे, विजय पाचंगे, किस्ना विरोळे, आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या