शितोळे शिरुर मल्लसम्राट तर वडघुले उपविजेता (Video)

शिरुर, ता.२३ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : करडे(ता.शिरुर) येथे भरविण्यात आलेल्या शिरुर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेत  झालेल्या अटीतटीच्या लढतीत  स्वप्निल शितोळे याला शिरुर मल्लसम्राट होण्याचा मान मिळाला  तर  सचिन वडघुले हा उपविजेता ठरला.
करडे (ता.शिरुर) येथे रविवार दि. २१ पासुन मंगळवार दि.२३ पर्यंत शिरुर तालुका मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती.रविवारी मान्यवरांच्या हस्ते वजन काट्याचे व बजरंगाचे पुजन करुन  वजने घेतली. यासाठी वजन मर्यादा ७५ ते १२५ किलो ठेवण्यात आली होती.बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या वतीने मल्लसम्राट विजेत्यास चांदीची गदा देण्यात आली तर गणेगाव खालसाचे सरपंच रमेश तांबे यांच्या कडून बुलेट गाडी भेट देण्यात आली.तसेच उपविजेत्यास गणेश बेंद्रे यांच्याकडुन स्पेंडर गाडी भेट देण्यात आली. विजेत्यास उद्योजक प्रफुल्ल लुंकड यांच्याकडुन रोख १५,५५५ रुपयाचे तर उपविजेत्यास ११,१११ रुपयाचे बक्षिस देण्यात आले. करडे, लंघेवाडी व चव्हानवाडी ग्रामस्थांकडून विजेत्यास चषक देण्यात आले.

२८ किलो वजनगटात प्रशांत रुपनर,३२ किलो वजनटात अमित गंगाराम कुलाळ, ३८ किलो वजनगटात राजन अशोक चव्हान, ४५ किलो वजनगटात आदित्य सुनिल जाधव, ५२ किलो वजनगटात अर्जुन बंटी गव्हाणे, ६० किलो वजनगटात तुषार घाडगे, ६६ किलो वजनगटात आबा शेंडगे, ७४ किलो वजनगटात शुभम बाळासाहेब जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळविले.

तीन दिवसीय दिवस-राञ अशापद्धतीने व प्रकाशझोतात सामने खेळवले गेले. सहभागी मल्लांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामस्थांच्यावतीने पुरविल्या गेल्या. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे कुस्तीगीर संघाचे सचिव बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदिप भोंडवे, कार्याध्यक्ष विलास कथुरे, अॉलिम्पिकवीर मारुती आडकर, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव किसन बुचडे, तालुकाध्यक्ष कानिगनाथ गव्हाणे, आप्पासाहेब धुमाळ, तालुका सचिव झेंडू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आमदार बाबुराव पाचर्णे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद पंचायत समिती सभापती सुभाष उमाप, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, सरपंच रुपाली वाळके, उपसरपंच गणेश रोडे, लंघेवाडीचे माजी सरपंच संतोष लंघे, करडेच्या माजी सरपंच कविता जगदाळे, भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे, भाजपाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल घायतडक, कैलास पाचर्णे, नगरसेवक विठ्ठल पवार, अभिजित पाचर्णे, पं.स.सदस्य विश्वास कोहोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे, खरेदी विक्री चे संचालक आबासाहेब सोनवणे, अशोक चव्हाण, रामभाउ देवकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेला निरीक्षक म्हणुन मेघराज कटके यांनी तर पंच म्हणुन मोहन खोपडे, रविंद्र बोञे, चंद्रकांत मोहोळ, रोहिदास आमले, प्रकाश घोरपडे, केशव बोञे, सचिन आव्हाळे, प्रदिप बोञे, पप्पु कालेकर व बाळासाहेब भालेराव यांनी काम पाहिले.जिल्हा उपाध्यक्ष रामभाउ सासवडे हे विशेष लक्ष ठेवुन  होते. या वेळीे जि.प.सदस्य राजेंद्र रणजित जगदाळे (पाटील) यांचा  वाढदिवस साजरा करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या