गुनाट-न्हावरे रस्त्यावर अपघातात एक ठार

गुणाट, ता.२४ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : गुनाट-न्हावरे रस्त्यावर टेंपो ने मोटारसायकल ला धडक दिल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली.

मच्छिंद्र संपत गिरमकर (वय.४४, रा.गुणाट) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरमकर हे शेताला पाणी देउन घरी येत असताना गुणवंत वाडी कॅनॉल शेजारी गुनाट न्हावरे रस्त्यावर टेंपो वरील चालकाने मोटारसायकल ला धडक दिली.या अपघातात मच्छिंद्र गिरमकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला. या प्रकरणी सुधिर गिरमकर यांनी शिरुर पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार गायकवाड हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या