शिवसेनाप्रमुखांचे विचार तळागाळात पोहोचवाः काशिद

शिरुर, ता. २४ जानेवारी २०१८ (प्रतिनीधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून, बाळासाहेबांचे विचार हे प्रेरणादायी असल्याने प्रत्येक शिवसैनिकाने अंगी बाणावेत असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त शिरुरतालुका, शिरुर शहर, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, यांच्यावतीने शिरुर शहरात अभिवादन सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी काशिद हे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि,शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील तळागाळासाठी झटताना ८० टक्के  समाजकारण व २० टक्के राजकारण ही जी शिकवन शिवसैनिकांना दिली आहे ती शिकवन प्रत्येकाने आत्मसात करुन समाजाचे प्रश्न सोडवावेत. या वेळी नगरसेविका अंजली थोरात यांच्यावतीने स्वखर्चातुन शिरुर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील ५० कर्मचा-यांना स्वच्छता विभागाचे किट(झाडु,हॅंडग्लोव्हज,मास्क इ.)वाटप करन्यात आल्या.यावेळी या कामाचे कौतुक काशिद यांनी केले.प्रारंभी नगरपालिकेच्या शेजारी शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे व शहर प्रमुख संजय देशमुख यांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.व अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी  तालुकाप्रमुख पोपट शेलार,संपदा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर डेरे(मामा), स्वच्छता व आरोग्य समिती सभापती सचिन धाडिवाल, नगरसेवक अभिजित पाचर्णे, नगरसेविका अंजली थोरात, ज्योती लोखंडे, सुनिता कुरंदळे, उपशहरप्रमुख मयुर थोरात, महिला आघाडी संघटक विजया टेमगिरे, अनघा पाठक, सुरेश गाडेकर, निखिल केदारी,उप तालुका प्रमुख किरण देशमुख आदी उपस्थित होते.

शिरुर नगरपालिका मंगलकार्यालयात युवासेना व भारतीय विद्यार्थी सेना यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश कवडे यांच्याहस्ते करण्यात आले.या वेळी १०० च्या पुढे रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल  काशिद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहर प्रमुख संजय देशमुख,उप तालुका प्रमुख किरण देशमुख, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख अनिल पवार, युवासेनाशहर अधिकारी सुनिल जाधव, शिरुर तालुका संघटक कैलास भोसले,शहर संघटक राजेंद्र शिंदे, भारतीय विद्यार्थी सेना तालुका संघटक निलेश गवळी,रोहित कुरंदळे, रोहिदास शिवले, संतोष काळे, मयुर थोरात, सुरेश गाडेकर, नगरसेविका अंजली थोरात, दादा काशिद, सुनिल जठार, माजी शहरप्रमुख बलराज मल्लाव, अमोल काळे, लोकजागृती संघटनेचे रविंद्र धनक, रिक्षा पंचायत चे अनिल  बांडे, नगरसेवक मंगेश खांडरे, अभिजित पाचर्णे, नितीन पाचर्णे, निलेश गाडेकर, नगरसेविका ज्योती लोखंडे, सुनिता कुरंदळे, शशिकला काळे, संजय पवार, मंगेश कवाष्टे, पोपट ढवळे, सोनु काळोखे, आकाश ढवळे, आदींसह ससुन सर्वोपचार रुग्णालयाचे राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे डॉ.उज्ज्वल देवकाते व सहकारी उपस्थित होते.

शिरुर शहरातील पाचकंदील चौकात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सन-१९८४ साली ऐतिहासिक सभा पार पडली होती.या चौकाला स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासुन शिवसैनिक व नागरिक करत आहेत.केंद्रात व राज्यात शिवसेनेची सत्ता असुन शिरुर लोकसभा या मतदार संघाचे खासदारही शिवसेनेचेच आहेत व नगरपालिकेतही शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत.त्यामुळे या जयंतीला तरी सर्वसामान्यांची हि अपेक्षा पुर्ण होइल असे वाटत होते. माञ ही मागणी आजही पुर्ण होउ न शकल्याने याबाबत अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या