निमोणेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर

निमोणे, ता. 25 जानेवारी 2018 (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे शुक्रवारी (ता. 26) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक काळे यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली.

या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांच्या हस्ते होणार आहे. शिंदोडी, गुनाट, चिंचणी, करडे, मोटेवाडी, आंबळे व आसपासच्या गावातील सर्व युवकांनी या शिबिरात भाग घ्यावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या