आश्लेषा ताई या लहान मुलीच्या कीर्तनाने भाविक झाले मंत्रमुग्ध

तळेगाव ढमढेरे, ता. 25 जानेवारी 2018 (एन. बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यालगत चार गावांच्या शिवेवर असणारे गणपतीचा माळ येथे गणेशाचे जागृत देवस्थान आहे. गणेश जयंतीनिमित्त परिसरातील सर्व गणेशभक्तांनी एकत्र येऊन गणेश जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बालकीर्तनकार आश्लेषा घोलपचे कीर्तन हे सर्व भाविक भक्तांचे आकर्षण होते.
सकाळपासून प्रसन्न वातावरणात लहानग्या पासून ते ७० वर्षाच्या जेष्ठ नागरिकाची या गणेश जयंती साठी उपस्थिती होती. पहाटे चार वाजता काकड आरतीसाठी परीसरातून तळेगाव ढमढेरे, कासारी, टाकळी भिमा, निमगाव म्हाळुंगी, येथील भाविक उपस्थित होते.यावेळी पहाटे काकड आरती, सकाळी श्रींची महापूजा, सायंकाळी हरिपाठ व महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले तर रात्री ९ ते ११ कुमारी आश्लेषा घोलप या लहान मुलीचे कीर्तन झाले. यावेळी आश्लेषा चा भाऊ अभय मुद्रुंगमणी याने साथ देऊन उपस्थितांचे मने जिंकली. ११ च्या नंतर हरीजागर करण्यात आला.

आश्लेषाच्या घरची परिस्थिती बेताची असूनही....
निमगाव म्हाळुंगी येथे श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत शिकत असलेल्या आश्लेषाच्या घरची परिस्थिती बेताची असूनही भाऊ आळंदी येथे ज्ञानग्रहण करून तबलावादकचे शिक्षण घेत आहे. आश्लेषाने परीसरात छोटी छोटी कीर्तने करून नावलौकिक मिळवला आहे. बालकीर्तनकार म्हनून कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी बोलताना आश्लेषा हिने सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या