पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील यांना विशेष सेवा पदक

शिरुर, ता. २७ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील यांना पोलीस विशेष सेवा पदक देउन प्रजासत्ताक दिनी गौरविण्यात आले.जिल्हयातील चार अधिका-यांना हे पदक देण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि,गडचिरोली या नक्षलवादी भागात पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी केलेल्या तीन वर्षाच्या कामगिरीत महत्वपुर्ण सेवा बजावत नक्षलवाद्यांवर जरब बसविण्याचे काम केले होते.त्याचप्रमाणे समुपदेशन केंद्र, गोपनीय, गस्तीपथक आदी कामे प्रभावीपणे हाताळली होती.त्यांच्या या कामांची दखल घेउन पोलीस अधिक्षक मोहम्मद सुवेझ हक यांच्या हस्ते त्यांना विशेष सेवा पदक देउन सन्मानित करण्यात आले.
या वेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, उपविभागीय अधिकारी मुजावर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी आदी उपस्थित होते.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने यांनाही विशेष सेवा पदक देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या