गणेगाव हाफ मॅरॅथॉनमध्ये धावले हजारो धावपटू (Video)

गणेगाव खालसा, ता.२८ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : पहाटेची कडाक्याची थंडी...सगळीकडे लहानांपासुन आबालवृद्धांची लगबग...रस्त्या रस्त्यांवर धावणारे तरुण असे आगळे वेगळे चिञ पुणे जिल्ह्यातील गणेगाव खालसा येथे आज अनुभवायला मिळाले.

पुणे जिल्हयात प्रथमच ग्रामीण भागात फ्री रनर चॅरीटेबल ट्रस्ट पुणे व गणेगांव हाफ मॅरॅथॉन 2018 यांच्या संयुक्त विद्यमाने  महा मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन साठी राज्यभरातील धावपटुंनी सहभाग घेतला होता. आयोजित करण्यात आलेल्या या महा मॅरेथॉन स्पर्धेत तालुक्यासह राज्यभरातील हजारो स्पर्धक धावले. स्पर्धेत १५० शिक्षक, ५० डॉक्टर, ३० उच्च दर्जाचे अधिकारी व ६० टक्के विद्यार्थी व ४० टक्के महिलांनीही सहभाग घेतला. खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ७५ महिला पोलीस अधिकारी यांनी सहभाग घेतला. तालुक्यातुन महिला, मुलींची संख्या लक्षणीय होती.
रविवारी (ता. 28) पहाटे पाच वाजता गणेगाव-रांजणगाव गणपती मार्गावरील मोकळ्या मैदानावरुन प्रारंभ झालेल्या मॅरेथॉन मध्ये शिरूर तालुक्यातील धावपटूंसह राज्यभरातील स्पर्धेक सहभागी झाले होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवुन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. गणेगाव खालसा येथे स्पर्धेच्या आयोजनाचे हे दुसरे वर्षे आहे.

या मॅरेथॉन मध्ये 5, 10 व 21 कि.मी. धावणे, पुरुष व महिला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये सहभागी झालेल्या प्रथम तीन क्रमांकांना स्मृतीचिन्ह व रकमेचा धनादेश व सहभागी खेळाडूंना टि-शर्ट व पदक देण्यात आले. महाराष्ट्र कबड्डी संघाचा कर्णधार नितीन मदने व महाराष्ट्र केसरी विजेता अभिजीत कटके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी परदेशी पाहुण्यांसह फ्री रनर चॅरीटेबल ट्रस्टच्या संगिता ललवानी, जितेंद्र नायर, तहसीलदार अर्चना तांबे, सरपंच रमेश तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महिलांचा सहभाग अधिक...
गणेगाव हाफ मॅरेथॅान मध्ये जिल्हा परीषद प्राथमिक शाळेने लेझीम खेळाचे सादरीकरण केले. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कराटे चे प्रात्यक्षीक दाखविण्यात आले. सांगली जिल्ह्याच्या हलगीच्या तालावर बक्षीसाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी खेळाडूंनी जल्लोष केला होता. जेष्ठाबरोबर महिलांचा सहभाग या मॅरेथॅानचे वैशिष्ठय ठरले.


स्पर्धेतील प्रथम तीन विजेते पुढीलप्रमाणे :
5 कि.मी. धावणे- (पुरुष)
1) अक्षय मोरे (कोल्हापूर), 2) प्रताप जाधव (कोल्हापूर), 3) अभिजीत मोरे (शिक्रापूर)

5 कि.मी. धावणे- (महिला)
1) दीपाली ठाकरे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर), 2) रुक्मिनी जन्मले (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर) 3) नयना चवरीवाल

10 कि.मी. धावणे- (पुरुष)
1) हिंमत दाभाडे (कोल्हापूर), 2) दिलीप राऊत (सोलापूर), 3) ज्योतीराम कौलगे (आगाशे कॉलेज)

10 कि.मी. धावणे- (महिला)
1) कोमल ढबाले, 2) दिक्षीता पवार, 3) यमुना लडकत (शाहू कॉलेज)

21 कि.मी. धावणे- (पुरुष)
1) गणेश मांढे (गरवारे कॉलेज, पुणे), 2) सतीश कासळे (डेक्कन, पुणे), 3) सौरभ जाधव (एसएनजीसी कॉलेज)

21 कि.मी. धावणे- (महिला)

1) यामिनी ठाकरे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर), 2) संपदा बुचुडे (सनस मैदान, पुणे), 3) अश्विनी शिंदे (खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या