...अन उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या

शिरूर,ता.२९ जानेवारी २०१८(मुकुंद ढोबळे) : जन्माने जरी मुस्लिम असले तरी जैन समाजात आयुष्य व्यथित केलेल्या त्यांची अखेरची एक्झिट ही सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावुन अन सर्वच शिरुरकरांना चटका लावुन गेली.
सविस्तर  असे कि, शिरूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी भानुशेठ कर्नावट या जैन समाजाच्या व्यापाऱ्यांचे तंबाखू विक्री चा व्यवसाय सुरू होता. त्यावेळेस भानुजी कर्नावट, अनुजी कर्नावट, मोतीलाल कर्नावट हे एकत्र रहात होते.स्वातंत्र्यापूर्वी 1942 च्या आसपास त्यांच्याकडे बंटी उर्फ लतीफ मुंडा शेख हा कामासाठी आला आणि काम करू लागला. बघता बघता बंटी हा कर्नावट कुटुंबाशी एकरूप झाला. त्याला दोन भाऊ होते परंतु त्यांच्याकडे तो कधीच गेला नाही.बंटी स्वभावाने थोडा रागीट स्वभावाचा होता त्याला जे वाटेल तेच खरे असा त्याचा स्वभाव होता मालक भानुजी कर्नावट त्यांच्या थोडीशी हुज्जत झाली की बंटी रुसून जायचा शिरून एस टी स्टँड वरती थोडा बसल्यानंतर तो पुन्हा दुकानाजवळ चहा च्या टपरीवर बसायचा आणि दुकानांवर लक्ष ठेवायचा. मालक त्याला पाहून त्यांच्या कडे जाऊन त्याची समजूत काढत नाही तोपर्यंत तो दुकानात येत नसे. परंतु दुकानाकडे लक्ष बाहेरून देत असे.मालक भानुजी अतिशय प्रेमळ स्वभावाचे असल्याने ते काही वेळेत चहाच्या टपरीवर जाऊन बंटी ची समजूत काढली की बंटी लगेच कामावर हजर.त्याचे खाणेपिणे, झोपणे भानुशेठ कर्नावट यांच्या घरात होते.घरातील व्यक्ती म्हणून तिथे रहात होता.

भानुशेठ यांच्या पत्नी, दोन मुले रमेशशेठ कर्नावट, गौतम कर्नावट , त्यांच्या पत्नी याही सर्वजण त्यांची देखभाल करीत असत. घरातील मोठी व्यक्ती असल्यासारखे मान द्यायचे. ईद आली की त्याला नवीन कपडे, दिवाळी ला हि त्याला नवीन कपडे असायचे त्याच्या आजारपणातही सर्व देखभाल कर्नावट कुटुंब करीत असे. कालांतराने सर्व तंबाखुचे दुकानात बंटी सांभाळत असे. बंटी ला दोन भाऊ होते परंतु काही दिवसांनी तेही या जगात राहिले नाही. परंतु बंटी कर्नावट कुटुंबाशी एकरूप झाले होते.कर्नावट च्या तंबाखू दुकानाचा सर्व व्यवहार बंटी च्या हातात होता.

बंटी च्या स्वभावामुळे तो सर्व परिचित झाला आणि बंटी चे तंबाखू दुकान म्हणून सर्वजण कर्नावट यांच्या दुकानाची ओळख झाली संपूर्ण शिरूर शहर आणि तालुक्यात बंटी आणी तंबाखू दुकान सर्व परिचित होते. कर्नावट कुटुंबांनी हि त्याला कधी मुस्लिम असल्याची जाणीव करून दिली. भानुजी कर्नावट यांचे नातू डॉ.अमित, अभिजित, गट्टु, आशिष  कर्नावटयांनी व त्यांच्या नातसून यांनी हिं बंटीला कधी परकेपणाची वागणूक दिली नाही. त्यांच्या घरातील मोठ्या व्यक्तीना जो मान द्यायचे तोच मान बंटी ला देत होते. या कुटुंबाचा बंटीशी घरातील परिवारातील सदस्यांइतकाच स्नेह होता.दरम्यान बंटी हा वार्धक्याकडे झुकल्याने काम बंद केले होते.तरीही सगळी विचारपुस या कुटुंबाकडुन होत होती. आठवड्यापूर्वी बंटी आजारी पडल्याचे डॉ.अमित यांना कळाले त्यांनी तातडीने  बंटी यांना दवाखान्यात दाखल केले अन उपचार सुरु केले.

उपचार सुरु असतानाच रात्री बंटी ची तब्बेत ढासळली आणि कर्नावट कुटुंबाच्या ह्रुदयाचा ठोका चुकू लागला त्यावेळी त्यांच्या घरातील महिलांनी नवकार मंत्राचा जाप सुरू करून त्यांच्या आयुष्या साठी प्रार्थना सुरू केली. त्याच वेळेस डॉ.अमित कर्नावट यांनी मुस्लिम समाजाचे नेते माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण यांच्याशी संपर्क साधून बंटी बाबांची तब्बेत ढासळली असल्याचे सांगितले. त्यावेळेस जाकीर पठाण यांनी त्यांच्या तब्बेतीची चौकशी करून कुराण पठनासाठी येथे काही महिलांना पाठवले मुस्लिम समाज कुराण पठण आणि नवकार मंत्राचे जाप बंटी शेख साठी एकाच खोलीत प्रार्थना चालू होती. हे देशातील पहिलेच उदाहरण होते.अखेर (दि.27) जानेवारी रोजी अकरा वाजता बंटी ने अखेर चा श्वास घेतला आणि कर्नावट कुटुंब दुःख सागरात बुडाले.

बंटीचे निधन झाल्यानंतर सर्वांना  शववाहीनीतुन मुस्लिम स्मशानभूमीत म्रूतदेह घेऊन अंत्यसंस्कार केले जातील असे वाटत होते परंतु रमेश कर्नावट यांनी बंटी यांची अंत्ययात्रा आमच्या बंगल्यातुनच निघणार असे सांगितले. बंटी यांचा मृतदेह कर्नावट कुटुंबाची  रेव्हेन्यू कॉलनी यांच्या घरी आणला आणि कर्नावट कुटुंबातील महिला पुरुष यांच्या भावनांचा बांद फुटला हे दृष्य पाहून उपस्थित सर्व मुस्लिम,हिंदू,जैन समाजाच्या नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.मुस्लिम समाजाच्या परंपरा नुसार सर्व विधी उरकून जैन समाजाच्या कर्नावट कुटुंब यांच्या बंगल्यातुन बंटी शेख याचा जनाजा निघाला त्यावेळी जनाजाला खांदा देण्याचे काम रमेश कर्नावट, रवींद्र कर्नावट, अमित कर्नावट, अभिजित कर्नावट, मुकेश कर्नावट यांनी केले. हे जातीय सलोख्याचे उदाहरण समाजाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

अंत्यविधी शिरूर येथील मुस्लिम दफनभूमीत करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण,  मुस्लिम जमात अध्यक्ष इकबाल सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान, सिकंदर मण्यार,नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक पोपट ओस्तवाल, संजय खांडरे, वाहेदभाई शेख, डॉ.झे.के.भळगट, बांधकाम व्यावसायिक सुमतीलाल खाबीया, गोडिजि पार्श्वनाथ विश्वस्त रमाकांत बोरा,विद्याधाम प्राशालेचे विश्वस्त राजू भटेवरा, धरमचंद फूलफगर, खरेदी विक्री चे संचालक शरद कालेवार, आझाद हिंद मंडळाचे अध्यक्ष शंकरकाका परदेशी  पार्श्वप्रज्ञालय तळेगाव दाभाडे सचिव संतोष पटवा, नितीन खांडरे, व मोठ्या संख्येने हिंदू,मुस्लिम, जैन समाजाचे नागरिक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या